- मंत्रालयात पिक अव्हरची विभागणी केली जाणार
- ज्यांनी शक्ती प्रदर्शन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
- डेलकर हे केंद्रशासित प्रदेशातून होते त्यामुळे मी पंतप्रधान व ग़ृहमंत्र्यांना विनंती करतो की मुंबई पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश द्या
- डेलकरांची बाजू का कुणी मांडत नाही? डेलकरांसाठी का कुणी रस्त्यावर उतरत नाही
- त्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावं असतील तर त्यांचेही राजीनामे घेणार का?
- त्या आत्महत्येमध्ये १३ -१४ पानांची सुसाई़ड नोट आहे. एका सात टर्मच्या खासदाराने आत्महत्या केली. पण त्याच्या सुसाईड नोटची दखल घेतली नाही.
- गेल्या आठवड्यात आणखी एक आत्महत्या झालेली आहे. त्यावर कुणीच बोलत नाही.
- त्यामुळे यात कुणीही आतातायी पणा करू नये. पुरावे तपास यंत्रणेकडे द्या.
- पूजा चव्हाणच्या आई वडिलांची हीच मागणी आहे की आमच्या मुलीची बदनामी थांबवा
- तपास य़ंत्रणाच विरोधकांनी खोटा ठरवला आहे – उद्धव ठाकरे
- विरोधकांकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही.
- देश विकायला काढणारे अशी भाजपच्या सरकारची ओळख तयार होणार आहे. त्यामुळे देवेंद्रजींनी मला फुकटचे सल्ले देऊ नये – उद्धव ठाकरे
- पूजाच्या आई वडिलांचा सरकार व तपास यंत्रणेवर विश्वास आहे.- उद्धव ठाकरे
- फक्त संशय़ावरून संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये – पूजाचे आई वडिल
- संजय राठोड यांच्या राजीनाम्य़ाची कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही – पूजा चव्हाणचे आई वडिल
- पूजाचे आई वडिल मला भेटले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी मला एक पत्र लिहलं आहे.
- ही तपास यंत्रणा तीच आहे जी तुमच्या सरकारच्या वेळी होती. मग आता अविश्वास का दाखवता?
- पण ती चौकशी होण्याआधीच विरोधकांची आदळाआपट सुरू आहे.
- आम्ही कुणालाही पाठिशी घालणार नाही.
- प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. इतके दिवस का लावले असा विचार करत असाल.ज्या क्षणी ही घटना घडली त्या क्षणापासून आम्ही निपक्षपातीपणे चौकशी करण्याचे आदेश दिले. कालबद्ध तपास करा व अहवाल आम्हाला द्या,
- संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे.
- एखाद्याला अडकवायचं आहे, लटकवायचं आहे असं झालं नाही पाहिजे.
- तपास झाला पाहिजे मात्र तो निपक्ष:पातीपणे झाला पाहिजे
- मात्र गेल्या काही महिन्यात गलिच्छ राजकारण सुरू आहे.
- सरकार चालवताना आमची जबाबदारी असते न्यायाने वागणे
- का नाही केंद्र सरकारच्या इथे जाऊन बोंबलत
- खोटं बोलायचं ते रेटून बोलायचं असं झालं आहे. ही बोलघेवडी माणसं आहेत.
- विरोधक पेट्रोल डिझेल दरवाढीवर गप्प का? – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- त्यांनी अशा प्रकारे कर लावला आहे की त्याने राज्याला काहीच मिळणार नाही.
- डिझेल पेट्रोलचे दर वाढतायत त्यासाछी आंदोलन का केलं जात नाही.
- जीएसटीचे २९ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे.
मराठा आरक्षणात त्यांनी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही देऊ असे त्यांनी सांगितले. त्यावरून आम्ही त्यांचे आभार मानतो - सीमाप्रश्नावर आपण सर्व एकत्र आहोत असे ते बोलले. केंद्रात व सत्तेत तुम्ही आहात. कर्नाटकात तुमचं सरकार आहे केंद्रात तुमचं सरकार आहे.
- ज्या लढ्याचं, धारावी पॅटर्नचं जगभरात कौतुक झालं. कोविड योद्ध्यांचं शोौर्य तुम्ही नाकारत आहात. हा विरोधी पक्षाचा दुतोंडी पणा आहे.
- कोविडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. मला त्यांची कीव येते. काय परिस्थितीत आपण कसा मार्ग काढला. ते आपण त्यांच्या समोर ठेवले आहे.
- विरोधी पक्षाने आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी काही आरोप केले. मात्र आरोपांना काही तथ्य असलं पाहिजे
- ८ मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाईल.
- कुठेही काही कमी पडू न देण्याच्या जिद्दीने प्रयत्न करतोय
- मी व सरकार प्रयत्न करत आहोत. दुसरी लाट जास्त वाढू न देता थोपविण्याचा प्रय्तन करतोय़.
- गेल्या वर्षी याच वेळी कोविडने प्रवेश केला होता. अजुनही कोरोनाचा धोका गेलेला नाही. तो अजुन वाढताना दिसतोय
- उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.
सौजन्य : दैनिक सामना