अभिनेता चिराग पाटील याने आपल्या लग्नाचा चौथा वाढदिवस नुकताच पत्नी साना अंकोला हिच्यासोबत खासगीत साजरा केला. मात्र त्यानंतर त्याने आपल्या आयुष्यातील या खास घटनेचा फोटो एक आठवण म्हणून इन्स्टाग्रामवर शेयर केला. या पोस्टमध्ये चिरागने चार फोटो टाकले आहेत. यातला पहिला फोटो त्याच्या लग्नाच्या वेळचा आहे, तर इतर फोटो त्यांच्या यशस्वी वैवाहिक आयुष्यातले आहेत. या चारही फोटोंमध्ये चिराग पाटील आणि त्याची पत्नी साना दोघेही खूपच छान दिसत आहेत.
चिराग हा क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा आहे, तर साना ही क्रिकेटपटू सलील अंकोला यांची मुलगी आहे. चिराग व साना एकमेकांना गेल्या २२ वर्षांपासून ओळखत आहेत. १० वर्षांपासून ते एकमेकांना डेट करू लागले आणि आता चार वर्षे झालीयत त्यांच्या लग्नाला… ही आठवण चिरागनेच आपल्या या पोस्टमध्ये सांगितली आहे. यातच त्याने ‘तुम हो तो मैं हूं, मैं हूं तो सबकुछ है, तुम नहीं तो कुछ नहीं, कुछ भी नहीं’ अशा प्रेमाच्या ओळीही टाकल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते भरभरून लाईक्स व कमेंट्स टाकत आहेत. चिराग लवकरच ‘८३’ या क्रिकेटवर आधारलेल्या हिंदी चित्रपटात वडिलांची, संदीप पाटील यांचीच भूमिका साकारणार आहे.