कांदिवलीत सामाजिक उपक्रम
श्री साईबाबा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 23 जानेवारीला सायंकाळी 4 ते रात्री 8 या वेळेत कांदिवली पश्चिम, एमजी क्रॉस रोड क्र. 4 येथील श्री मार्कंडेश्वर मंदिर पटांगणात करण्यात आले आहे. याशिवाय सायंकाळी 5 ते 9 या वेळेत सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडणार आहेत. नवीन मतदार नोंदणी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार आदी उपक्रम पार पडणार आहेत.
शिवशंभो क्रीडा मंडळातर्फे गोराईत शिबीर
शिवशंभो क्रीडा मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. 24 जानेवारीला सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत बोरिवली पश्चिम गोराई 2 येथील सेंट रॉक्स शाळा येथे हे शिबिर होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा क्रिकेटचे सामने रद्द करून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदात्यांनी मोठय़ा प्रमाणात शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन शिवशंभो क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नितीन कदम तसेच वृत्तपत्र लेखक नरेंद्र कदम यांनी केले आहे.
दादरमध्ये संकल्प 1001 रक्तदानाचा
शिवसेना शाखा क्रं. 192 च्यावतीने शनिवार, 23 जानेवारीला सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रानडे रोडवरील डॉ. अॅंटोनिया डिसिल्वा हायस्कूल पटांगण आणि मॉंसाहेब सौ. मीनाताई ठाकरे फूल मंडई येथे स्व. सुदाम मंडलीक प्रतिष्ठानच्या सहकार्याने ही दोन्ही शिबिरे पार पडणार आहेत.
रक्तदानासाठी येथे 75 बेड्ची व्यवस्था करण्यात आली असून 1001 पिशव्या रक्तसंकलन करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे, अशी माहिती नगरसेविका प्रीती पाटणकर आणि शाखाप्रमुख यशवंत विचले यांनी दिली आहे.
लालबागमध्ये मुंबईचा राजातर्फे महाक्तदान शिबीर रविवारी
मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने 24 जानेवारीला महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. लालबाग येथील साईबाबा म्युनिसिपल हायस्पूल येथे सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत रक्तदान शिबीर पार पडणार आहे. सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू दिल्या जातील. केईएम, जे.जे., नायर रुग्णालय, जसलोक रुग्णालय, वाडिया रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबीर पार पडणार आहे. अधिकाधिक रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबईचा राजा मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी केले आहे.