स्मार्टफोन निर्माती कंपनी अॅपल आता इलेक्ट्रिक कारनिर्मितीत पाऊल ठेवणार आहे. त्यासाठी कंपनीने ह्युंडाई मोटर्ससोबत करार केला आहे. ह्युंडाईच्या ई-जीएमपी प्लॅटफॉर्मवर ही कार बनवली जाणार असून 2025 मध्ये ही कार लॉंच होण्याची शक्यता आहे. या कारचे वैशिष्टय़ म्हणजे सिंगल चार्जिंगमध्ये 500 किमी अंतर कापणार आहे.
हायस्पीड चार्जरसह ही कार अवघ्या 18 मिनिटांत 80 टक्के चार्ज होईल. बऱयाच दिवसांपासून अॅपल कारनिर्मितीत पाऊल ठेवणार असल्याची चर्चा होती, अखेर ही चर्चा आता खरी ठरलीय. अॅपल इनसायडरच्या रिपोर्टमध्ये टीएफ सिक्युरिटीजचे अॅनालिस्ट मिंग ची पुओ यांच्या हवाल्याने ह्युंडाई ही सुरुवातीची कंपनी असणार आहे. यानंतर अॅपल अमेरिकन कंपनी जनरल मोटर्स आणि युरोपियन कार निर्माता कंपनी पीएससोबत मिळून कार निर्मिती करेल. ह्युंडाई मोबिस या कारचे पार्ट डिझाईन, उत्पादन करणार आहे. तर ह्युंडाईची उपकंपनी किया मोटर्स अमेरिकेत उत्पादन सुरू करणार आहे.