सोशल मिडीयावर चाहत्यांसाठी मजेदार पोस्ट टाकायचा हा अभिनेता अमेय वाघ याचा छंदच आहे. म्हणूनच तो अनेकदा काहीना काही मजेशीर पोस्ट टाकत असतो. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. म्हणूनच तो सोशल मिडीयावरही चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या चाहत्यांनाही त्याच्या या गमतीशीर पोस्ट आवडतात. एखाद्या फोटोवर त्याने टाकलेली कॅप्शन धम्माल असते. एखादा व्हिडीओ पोस्ट केला तर त्यातही काही ना काही वैशिष्ट्य असतेच. आताही अमेयने नुकताच एक सेल्फी व्हिडीओ बनवून तो पोस्ट केला आहे. तो मोटारीत बसला असून मोटार चालवतोय. या प्रवासादरम्यान त्याने केलेला हा व्हिडीओ आहे.
अभिनेता सिद्धांत चर्तुवेदीच्या ‘धूप’ गाण्यावर त्याने हा व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओसाठी अमेयने धमाल कॅप्शन लिहिले आहे. तो म्हणतो, ये ‘ऊन’ दिनों की बात है… यात गंमत अशी की उन्हात शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये अमेयसोबतच सूर्यकिरणेही दिसत आहेत. याच सूर्यकिरणांचा वापर करत अमेयने हा व्हिडीओ बनवला आहे. त्याने इन्स्टाग्रामवरील रील माध्यमात टाकलेला हा व्हिडीओ आणि त्याचे अफलातून कॅप्शन त्याच्या चाहत्यांना आवडले आहे. तशा कमेंट्सही ते त्याला देत आहेत.