मराठमोळे अभिनेते मागे राहात नाहीत. त्यांच्यात कलागुण इतके ठासून भरलेले असतात की त्यांना मोठमोठ्या संधी मिळतात. बॉलीवूडमध्येही ते दिमाखाने चमकतात. असाच एक हरहुन्नरी अभिनेता म्हणजे अक्षय टांकसाळे. मराठीतला हा गुणी अभिनेता लवकरच बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमात झळकणार आहे. यात त्याने चक्क तापसीसोबत स्क्रीनसुद्धा शेअर केली आहे.
अक्षयनेच याबाबतची माहिती इन्स्टाग्रामवरील आपल्या पेजवर तापसीसोबतच्या आपल्या फोटोसह दिली आहे.
https://www.instagram.com/p/CLCRrcuMkiI/
या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘तापसी पन्नूसोबत काम करतोय. यानिमित्ताने हिंदी चित्रपटांमध्ये पुन्हा परतलोय…’ तापसी खूप गुणी अभिनेत्री असून तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा होता असेही त्याने लिहिले आहे. ती एक माणूस म्हणूनही उत्तम असल्याचेही त्याने नमूद केले आहे. आता या सिनेमात अक्षय टांकसाळेची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तो लवकरच ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘बस्ता’, ‘सातारचा सलमान’, ‘आंबट शौकीन’, ‘जीएफबीएफ’ आणि ‘मूषक’ या आगामी चित्रपटांमध्येही दिसणार आहे.