कोरोना नाव ऐकताच भल्याभल्यांना धडकी भरते. अनेकांना तर हे नाव गेल्या वर्षभरापासून परिचयाचं झालंय. परंतु केरळच्या कोट्टायममधल्या एका तरुणानं चक्क आपल्या फर्निचरच्या दुकानाचं नावच कोरोना असं ठेवलंय. या दुकानाचं नाव येणाऱया जाणाऱयांचं लक्ष वेधून घेत असून नावामुळं आपल्याला खूप फायदा होत असल्याचं दुकानदाराचं म्हणणं आहे. महत्त्वाचं म्हणजे दुकानदारानं हे नाव लॉकडाऊनंतर नाही तर सात वर्षांपूर्वीचं ठेवलं होतं.
याबाबत दुकानाचे मालक जॉर्ज म्हणाले, कोरोना हा लॅटिन शब्द असून याचा अर्थ मुपूट किंवा क्राऊन असा होतो. त्यामुळं हे नाव मी त्यावेळी निवडलं होतं. आता हे नाव माझ्या व्यापारासाठी खूप फायदेशीर ठरतंय.
लॉकडाऊननंतर माझ्या दुकानाला भेट देणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढलीय. सोशल मिडियावरही या दुकानाचे फोटो चांगलेच व्हायरल होतायत.
सौजन्य : दैनिक सामना