• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

महागाईच्या बैलाला…

- सॅबी परेरा (कहीं पे निगाहें...)

चित्रसेन चित्रे by चित्रसेन चित्रे
May 10, 2022
in कहीं पे निगाहें...
0

कवी सौमित्र म्हणतो, ‘ऊन जरा जास्तच आहे, दर वर्षी वाटतं…’ महागाईचंही तसंच आहे. दररोज, दरमहा, दरवर्षी आपल्याला वाटत राहतं की महागाई जरा जास्तच आहे… दर सहा महिन्याला महागाई भत्ता वाढावा असे आपल्याला वाटते, त्याचवेळी महागाई मात्र आहे तिथेच राहावी अशीही आपली इच्छा असते. वाढणे हा महागाईचा स्थायीभाव आहे. महागाई ही मध्यमवयीन माणसाच्या पोटाच्या ढेरीसारखी असते. ती एकदा वाढली की कमी होत नाही. वाढत्या महागाईच्या प्रमाणात आपलं उत्पन्न वाढवण्यात जे अपयशी होतात तेच लोक वाढत्या महागाईच्या नावाने कुरकुर करीत असतात. म्हणूनच एका अनामिक शायरने म्हटलंय,
जिन्दगी की तन्हाई लिखूँ,
या अपनों की रुसवाई लिखूँ,
बढ़ती हुई महंगाई लिखूँ,
या घटती हुई कमाई लिखूँ।
‘हल्ली महागाई खूपच वाढलीय’ हे वाक्य आपल्याला सर्रास ऐकू येतं. या वाक्यातील ‘हल्ली’ या शब्दाला माझा तीव्र आक्षेप आहे. महागाई हल्ली वाढलेली नसून माणसाने चलनाचा शोध लावल्यापासून (किंवा त्या आधीपासूनही असेल) महागाई वाढतच आहे. पत्नी-विरहामुळे व्याकुळलेला कालिदासाच्या ‘मेघदूत’मधील यक्ष, आकाशातील मेघाबरोबर प्रियेला संदेश पाठवतो, कारण तत्कालीन महागाईमुळे सांडणीस्वारासोबत निरोप पाठवणे त्याला परवडत नाही. बायबलमधे जिझस पाण्यावरून चालतो, कारण महागाईमुळे त्याला होडीचे भाडे परवडत नाही. सुदामा श्रीकृष्णाला पोहे घेऊन येतो, कारण महागाईमुळे त्याला साजुक तुपातला शिरा परवडत नाही. महागाई अशी शतकानुशतके चालत आलेली आहे. ती नेहरूंनाही थोपवता आली नाही आणि मोदींनाही थोपविता येणार नाही.
अमुकतमुक वस्तूचे भाव आकाशाला भिडले अशी हेडलाइन पेपरमधे वाचायला मिळते. मी म्हणतो, भिडू दे की! आकाश काय फक्त मानवाच्या बापाची जहागीर आहे काय? आकाश जसं आपलं आहे तसंच ते कांदा, बटाटा, लिंबू, तेल याचंही आहेच की! आपल्याला आणि आपल्या भावांना जशी विमानात किंवा यानात बसून आकाशाला भिडायची, चंद्रावर जायची मुभा आहे तशी मुभा कांदा, बटाटा, लिंबू, तेल ह्यांच्या भावांना का नको? हा भेदभाव का?
महागाई हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. तो कुणा एकाच्या नाकर्तेपणाचा परिणाम नाहीये. महागाई फेस करताना आपल्या तोंडाला फेस येतोय हे असं काही आताच घडतंय असं नव्हे. पन्नास-साठ वर्षांपूर्वी महागाईविषयी बोलताना कैफी आझमींनी म्हटलं होतं की,
ऐसी महँगाई है कि चेहरा भी बेच के अपना खा गया कोई,
अब न वो अरमान हैं न वो सपने, सब कबूतर उड़ा गया कोई।’
कैफी आझमींनी ही कविता लिहिली तो काळ नेहरूंचा होता, त्यामुळे कबुतराच्या नथीतून नेहरूंवर तीर मारणारी कैफी आझमींची ही कविता चालून गेली. आजच्या नया हिंदुस्तानात, आपण राज्यकर्त्यांना दोष देणारं असं काही बोलू गेलो तर समाजमाध्यमी ट्रोलधाडी आपलं जिणं मुश्किल करून सोडतील. त्यामुळे आजकाल अशा संवेदनशील विषयावर व्यक्त होताना, आपण बायकोच्या माहेरच्या मंडळींबद्दल जितकं जपून बोलतो तितकं जपून बोलणे जरुरीचे आहे.
महागाई वाढलीय ही बाब खरी असली तरी त्यासोबत इतर किती गोष्टी वाढल्या आहेत तेही लक्षात घ्यायला हवं. विरोधी पक्षांनी, जनतेच्या वतीने गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्याबद्दल कंठशोष करण्यापेक्षा देशाचा जीडीपी किती प्रचंड वाढलाय हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. आज आपल्या देशात शिक्षणाचा दर्जा वाढलाय. युनिव्हर्सिटीत उपलब्ध नसलेल्या विषयांमधे डिग्री घेऊन लोक मोठमोठी पदे भूषवू लागली आहेत. सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत झालेली भरमसाठ वाढ हेच सिद्ध करतेय की देशात सुशिक्षित लोकांची संख्या वाढली आहे. ज्या देशात शिपायाच्या पदासाठी पदवीधर आणि क्लार्कच्या पदासाठी पीएचडीधारकांची रांग लागते त्या देशाला महान बनण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. म्हणून विरोधीपक्षीयांनी उगीच महागाईच्या नावाने गळे काढण्याची गरज नाही.
आज आपल्या देशाची निर्यात प्रचंड वाढली आहे. युरोप, अमेरिका, रशिया, चीन किंवा आखातातील एखाद्या देशाचे पंतप्रधान/ अध्यक्ष आपल्या देशात येतात, तेव्हा भारतात त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या देशाचा कुणीच नागरिक नसतो. आपल्यासाठी अभिमानाची बाब अशी आहे की आपले पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा त्यांच्या स्वागताला एखादा हॉल नव्हे, स्टेडियम भरभरून अनिवासी भारतीय जमतात. इतके शिकले सवरलेले, हुशार लोक आपण परदेशी एक्स्पोर्ट केले आहेत. इतर देश केवळ उत्पादने आणि सेवा निर्यात करीत असतात. पण एकेकाळी अर्ध्या जगावर राज्य करणार्‍या ग्रेट ब्रिटनसारख्या देशाला आपण विजय माल्या, नीरव मोदी, ललित मोदी यांच्यासारखे उद्योगपती एक्स्पोर्ट केले आहेत. आयर्लंड, मॉरिशस, स्विझर्लंड यांसारख्या देशाची अर्थव्यवस्था आपल्या भारतीयांच्या पैशावर अवलंबून आहे आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेतील भारतीय काळ्या पैशाचा वाटा दिवसेंदिवस वाढतच आहे. या सगळ्या वाढींच्या तुलनेत महागाईत झालेली वाढ अगदी मामुली आहे असं मला वाटतं.
आपण पाहतो की, ग्रामीण भागात फळे, भाज्या, दूध इत्यादींचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना आपले उत्पादन मातीमोल भावाने विकावे लागते आणि शहरातील उपभोत्तäयांना या गोष्टी न परवडणार्‍या भावात विकत घ्याव्या लागतात. या व्यवहारात, उत्पादक आणि उपभोक्ते भरडले जाऊन मधले व्यापारी, दलाल गडगंज नफा कमवितात. या मध्यस्थांच्या, दलालांच्या त्रासापासून भल्याभल्यांची सुटका झालेली नाहीये. मध्यंतरी, विठ्ठलाला पडलेल्या बडव्यांच्या वेढ्यांचे कारण देत राजकीय पक्ष सोडून गेलेले मनस्वी नेते आपल्याला ठाऊक आहेतच (त्यांनी नंतर स्वतःभोवती स्वतःचे बडवे तयार केले आणि ते चोराच्या आळंदीला जाणार्‍या वारीत सामील झाले ही बाब वेगळी)! तर असे हे बडवे, मध्यस्थ, दलाल किंवा अडत्यांमुळे वस्तूंच्या किमती आणि पर्यायाने महागाई वाढते हे सर्वमान्य सत्य आहे. हे वैश्विक सत्य माहित असल्यामुळेच ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन अलीकडील भारत भेटीत, नावापुरते राज्यकर्ते असणार्‍यांना न भेटता पडद्यामागून राज्य चालविणार्‍या उदयोगपतींना प्राधान्याने भेटले असावेत असा माझा कयास आहे. ‘देश बदल रहा है, ये नया हिंदुस्थान है, अच्छे दिन आनेवाले है’ हे सारं आपण जे ऐकत असतो, त्यात काहीच खोटं नाहीये. सरकारने ठरवलं तर महागाई पूर्णपणे नष्ट होऊ शकते. पण होईल काय की, गिधाडं, काळवीटं आणि बंगाल टायगरसारख्या लुप्त होऊ घातलेल्या प्रजातींप्रमाणे, भविष्यात महागाईदेखील लुप्त झाली तर पुढील पिढीला महागाई बघण्यासाठी म्युझिअममधे जावे लागेल. म्हणून सरकारला नाईलाजाने वस्तू आणि सेवांचे भाव वाढवावे लागतात.
माणुसकी महाग झालीय हे मात्र खरंय. एकीकडे सरकार म्हणतेय की आमच्याकडे माणुसकीचा पुरेसा साठा आहे आणि आम्ही तो योग्य वेळेत बाजारात आणू. पण आजच्या घडीला बाजारात माणुसकी औषधालाही सापडत नाही. एकेकाळी दुकानात माणुसकीचा पार्टी पॅक मिळायचा. हल्ली मिळालाच तर एखादा सॅशे मिळतो. सरकार म्हणतेय की माणुसकीच्या बाबतीत आम्ही केवळ आत्मनिर्भर झालोय, इतकेच नव्हे तर लवकरच आम्ही माणुसकीची निर्यातही सुरू करू. सरकारच्या वक्तव्याने केवळ बाजारात उत्साह वाढतो पण माणुसकीचा पुरवठा काही वाढत नाही आणि माणुसकी काही सामान्य माणसाच्या आवाक्यात येत नाही.
माणुसकी महाग झाल्याची बाब मी आमच्या आध्यात्मिक गुरूंच्या कानी घातली तर ते म्हणाले, की वत्सा, आज कोहिनूर हिर्‍याची किंमत हजारो कोटी रुपये आहे. पण आपण त्याबद्दल तक्रार करतो का? नाही ना! कारण जी वस्तू बाजारात विक्रीला उपलब्धच नाही तिचा भाव वधारला काय आणि घसरला काय, त्याने आपल्याला काय फरक पडतो? ‘हल्ली रोहित शेट्टी फारसे सिनेमे बनवीत नसल्याने ऑटो सेक्टरमधे मंदी आहे,’ हा मूलभूत अर्थशास्त्रीय सिद्धांत मांडणार्‍या माझ्या एका मित्राला मी, माणुसकी महाग झाल्याबद्दल छेडले, तर तो म्हणाला की, बाजारात कागद, शाई, पेन यासारख्या स्टेशनरी वस्तूंचे भाव वाढल्याचा फटका माणुसकीच्या उत्पादनाला बसला आहे. कारण आपल्याकडे प्रत्यक्ष व्यवहारात माणुसकी फारशी कधी नव्हतीच, जी काही होती ती कागदावरच होती! त्या कागदाचाच तुटवडा झाल्यामुळे माणुसकीचे उत्पादन ठप्प झालंय!
‘महागाई वाढलीच नाहीये’ हे पटवून देण्यासाठी माझा चाललेला आटापिटा पाहून आमच्या कट्टयावरील पोखरकर आप्पा म्हणाले, अरे उपरोधिकपणे का होईना महागाईच्या समर्थनार्थ तुझ्याच्याने इतकं बोलवते तरी कसं? उत्तरादाखल, मी त्यांना दोन जबाबदार नागरिकांचे यूट्युबवरील व्हिडीओ दाखवले. पहिल्या व्हिडिओत नाकाने कांदे-लसूण सोलणारी एक मंत्रीणबाई एका आंतरराष्ट्रीय परिषदेत म्हणत होती की, ‘महागाई आमच्या अपेक्षेइतकी वाढलेली नाहीये’. दुसर्‍या एका व्हिडिओत हजारोच्या लोकसमुदायासमोर सानुनासिक आवाजात रेकत एक बाबा वारंवार म्हणत होता,’ …ऐसे नहीं, पूरी ताकत से बताइये, की पेट्रोल के दाम, कम हुए कि नहीं हुए!!!’
मी त्यांना पुढे असंही म्हटलं की, ‘महागाई वाढली नाही’ हे माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी, अमुक वस्तूचा तमुक वर्षी काय भाव होता आणि आज काय भाव आहे ह्याची तुम्ही डझनावारी उदाहरणे द्याल. पण मला काही ते पटणे शक्य नाही. माझ्यालेखी वस्तूंपेक्षा माणूस जास्त महत्वाचा आहे. पन्नास वर्षापूर्वी माणसाची किंमत किती होती, आज काय आहे? आज माणसाला कवडीची किंमत नाही तरीही तुम्ही महागाई वाढलीय असं म्हणणार असाल तर ते मला कसं पटेल?

[email protected]

Previous Post

तो रोल सार्थकी लागला!

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Related Posts

कहीं पे निगाहें...

निंदकाचे घर…

October 6, 2022
कहीं पे निगाहें...

रात्रीच्या गरबात असे…

September 22, 2022
कहीं पे निगाहें...

शिक्षकांच्या बैलाला…

September 8, 2022
कहीं पे निगाहें...

देवा हो देवा!

August 25, 2022
Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

‘छबिलदास’ ते शिवाजी मंदिर

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.