• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

एप्रिल, मे सामान्य नव्हेतच!

- सई लळीत (विचारवंतीण)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 14, 2022
in मी बाई विचारवंतीण
0

परवा कोणतरी म्हणालं.. आता काय दोनच महिने राहिले. एप्रिल आणि मे. मग आलाच पाऊस. एवढी बेफिकिरी एप्रिल आणि मेबद्दल?
एप्रिल आणि मे हे फक्त दोन महिने आहेत? साधेसुधे.. सकाळी सूर्य उगवणारे आणि संध्याकाळी मावळणारे? एवढे सामान्य आहेत? बाकी विशेष काहीच नाही त्यांच्यात? हे काय फक्त साठ एकसष्ट दिवस आहेत?
आम्ही शाळेत असल्यापासून मुलांची कॉलेजं सुरु असेपर्यंत हे दोन महिने म्हणजे वर्षाची पर्वणी वाटतात. कुंभमेळ्याची पर्वणी बारा वर्षांनी येते. ही उन्हाळी पर्वणी दरवर्षी येते. वर्षभर आखलेले हजारो बेत तडीला जाण्याचा हा काळ! फक्त उन्हाचं सोनं करण्याची किमया आपल्या अंगात हवी.
जी माणसं असं म्हणतात की दोन महिने काय आत्ता जातील… त्यांना माहितेय का करवंदीचा, जांभळाचा, काजूचा आणि आंब्याचा मोहोर फुल परफॉर्मन्सच्या तयारीत आहे. सगळीकडे मंद सुगंध परमळत आहे.. करवंदीची फुलं म्हणजे तर स्टेजच्या मागे असलेल्या पांढर्‍या शुभ्र ड्रेसमध्ये चिमुकल्या मुलींसारख्या वाटतायत. आता सगळ्या मोहोरातून हळुवारपणे छोटे छोटे हिरवे मणी लगडतील… दिसामासाने वाढतील.. रंगरुप येईल.. मग ही फळं जून होतील. तेजस्वी तरणीबांड होतील. मग हळुहळू पक्व होतील. सर्वांना तृप्त करतील.
यांच्यामुळे जंगलं सजतील, पेट्या भरतील, बाजार साजरे दिसतील. बाळगोपाळ हरखतील. पोरीबाळी रस काढण्यात दंग होतील. रसांनी भरलेली ताटं साठांसाठी उन्हात नजराण्यासारखी तळपायला लागतील. करवंदांच्या निमित्ताने संध्याकाळी रानात फिरायचे रम्य बेत पार पडतील. हिरव्यागार कुड्याच्या पानांच्या खोल्यांमधे (द्रोणांमधे) काळीभोर करवंदं नवरत्नांच्या राशीप्रमाणे विसावतील. जांभळांनी जिभा जांभळ्या होतील. या गोष्टीला काही विलाज नाही. माणूस कितीही काटेकोर असला तरी जीभ जांभळी न होता जांभळं खाऊच शकत नाही. आंबे खाल्ल्यावर कपडे पिवळट भगवे होतील (रसामुळे), करवंदीच्या आंब्याच्या खिरमटीच्या हिरव्या इटुकल्या पानांवर वाटे पडतील.
जिभेवरची पुटं खरडून जातील. जिभा पण आळस झटकून तरतरीत होतील. आमच्याकडे कोकणात तर या दोन महिन्यात लग्नसराईला बहर येतो. बर्‍याच वेळा एप्रिलमध्ये मुलगी बघण्याचे कार्यक्रम पार पडतात आणि लगेचच मे महिन्यात लग्नाची वाजंत्री वाजतात. मे महिन्याच्या त्या सुगंधी रसरसलेल्या उन्हात घामाने निथळत खरेदीचे बेत होतात. शालूशेल्यांची खरेदी होते. दागिन्यांच्या घडणावळी होतात. आमंत्रणं दिली जातात. घटाघटा थंडा पिलं जातं. मोठेमोठे मांडव घातले जातात. सरसरावून रंगीबेरंगी पताका ओढल्या जातात. आणि बघता बघता दणक्यात लग्न पार पडतं. मोठमोठ्या टोपांमध्ये रटमटणारं जेवण हां हां म्हणता लोकांच्या पोटात विसावतं. कसला उन्हाळा आणि कसलं काय! लोकं ‘काय मरणाचा उकडताहा.. निस्त्या पाण्यानंच पॉट भरता..’ असं म्हणत जेवणावर आडवा हात मारतात. टोप धुवायची गरज नाही.. एवढे साफ होतात. बरी मस्त उन्हाळा एन्जॉय करतात.
आणि नंतर गच्च भरलेल्या एसटीमधून जाताना नवीन कोरे कपडे घालून घामाघूम झालेल्या नवर्‍याचा, शालू नेसलेल्या, चमकदार दागिने घातलेल्या आणि भरघोस केसांवर आबोलेचो वळेसार माळलेल्या बायकोसाठी विंडो सीट पकडताना जो काय कस लागतो… तो लोकांच्या कौतुकाचा आणि कोपराने ढोसून हसण्याचा विषय होतो.
बँडवाले, वाजंत्रीवाले, केटरिंगवाले, मंडप डेकोरेशनवाले, फेटे पुरवणारे, बाशिंग मुंडावळ्यावाले, पत्रावळी पुरवणारे, कासार मंडळी, ब्युटी पार्लरवाल्या, टेलर लोक या बहुतेक कारागीरांची वर्षाची कमाई याच दोन महिन्यात होते. छोट्या पाईप पेप्सी विकणारे याच दोन महिन्यात बिझनेस करतात.आइसप्रâुट विकणारे गावोगाव फिरतात. काजींच्या बदल्यात पण आइसप्रâुट देतात. आणि आयुष्यभर नॉस्टालजिक करुन टाकतात. कोकणात काजू, आंबे, फणस याबरोबरच मिरी, रिंगी, आमसोलं आणि घोटा नावाच्या सोलांची पण मोठी उलाढाल होते.
फक्त आबोलीचे वळेसार विकून मुलीसाठी छोटसं सोन्याचं कानातलं करणारी एक वैनीबाय माझ्या ओळखीची आहे. ही आबोलीची लालचुटुक वजनाला हलकी, पटकन न बावणारी फुलं ही फक्त उन्हाळ्यातच फुलतात. हे दोन महिने आलेच नाहीत तर अबोलीला काय वाटेल याचा कोणी विचार केलाय?
काही जणींना वाटतं उन हे फक्त उन्हाळी वाळवणांसाठीच आहे. गव्हाचा चीक, तांदूळ साबुदाणे, उडीद डाळ यांच्यापासून त्या अशा सुंदर नाजुक रेखाकृती तयार करतात की अंगणं कलादालनांसारखी दिसायला लागतात. मग हे सगळे दागिने खडखडीत वाळल्यावर स्वच्छ घासलेल्या डब्यात भरून ठेवताना त्यांचा चेहरा एवढा देखणा दिसायला लागतो की साक्षात सौभाग्यवती अंबानी वैनींनाही हेवा वाटावा. कारण हे भाग्य स्वत: राबून घाम गाळल्याशिवाय पदरात पडत नाही. घमघमीत मसाले याच दिवसात दळून आणून वर्षाच्या आमटी भाजीला चव आणली जाते.
फळांचा राजा आंबा या काळात आपला बेस्ट परफॉर्मन्स देतोच. पण त्याचा प्रधान फणसही काय मागे नसतो. आपल्या लख्ख सोनेरी रसाळ वैभवाने हा तळपत असतो. कच्च्या फणसाची भाजी हे कोकणातलं निगुतीने केले जाणारं हे तिखट पक्वान्न आहे… त्या भाजीतल्या पिठुळ शिजलेल्या तिखटमीठ लागलेल्या आठीळ्या एवढ्या छान लागतात की त्याच्यापुढे तुमचे कबाब झक मारतात (कबाब मी अजून खाल्ले नाहीत… पण एक अचूक अंदाज असावा बहुतेक). रसाळ फणसाला घाटावर शेंबडा म्हणतात! आमच्यात नाही म्हणत असं…! असं म्हटलं तर खाववणार तरी कसं?
घरोघरी तिजोरी उघडून ठेवावी तसे कापे, रसाळ फणस उघडून ठेवलेले असतात. कोणीही कितीही खा. कापा फणस फोडावा लागतो तर रसाळ फणस पुस्तक उघडावं तसा उघडतात. एखादा राक्षस प्रेमळ असावा तसं मला ते वाटतं! किंवा मग गोष्टीतल्या राक्षसाला उःशाप मिळून त्याचं गंधर्वात रुपांतर व्हावं तसं मला ते वाटतं. कारण वरती काटेच काटे असतात. फणसावर जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती काटे असतात याचा अभ्यास अजून तरी गुगल भाऊंनी केलेला नसावा. गुगलभाऊंच्या संशोधनासाठी हे एक मोठं दालन फुकटात उपलब्ध होवू शकतं. त्याचा काय उपयोग होणार नाही सोडा… नाहीतरी पीएचडीच्या कित्येक संशोधनांचा एक पगारवाढ ही गोष्ट सोडली तर पुढे काय उपयोग होतो?
गावात घर असणार्‍या माणसांना कधी फणस विकत घ्यावा लागत नाही. म्हणून कोकणात घर हवं. एकवेळ काश्मीरमध्ये नसेल तरी चालेल. फणस असलेल्या गावातल्या कोणत्याही झाडाकडे जायचं आणि फणस घेऊन यायचा. एवढंच काय ते उन्हाळी काम!
मग फणस नुस्ता खा… कापे पिके गरे उन्हात वाळवा, पिकलेल्या रसाळ गरांचं सांदणं करुन खा किंवा कच्चे गरे खोबरेल तेलात तळून वेफर्स करुन खा. फणस घरात आणला की माणूस फणसाबरोबर वेळही खूप खातो.फणसाने नाही म्हटलं तरी कोकणी माणसाला उद्योगी बनवलं आहे.
तर असे हे दोन महिने… कॉटनचे सुंदर हलके सुखद कपडे घालून मिरवणारे, थंड पाण्यात निथळणारे.. पावण्या सोयर्‍यांना भेटवणारे, खाण्यापिण्याचे बेत अमलात आणणारे, समुद्रावर खारट होणारे आणि वळीवाच्या पावसाच्या वाजपात धुंद होणारे.. त्यांना सामान्य लेखून कसं चालेल. ते असामान्य आहेत!

Previous Post

नाचणी : गरीबांचं `श्रीमंत’ धान्य

Next Post

लोभाची विषारी फळे

Related Posts

मी बाई विचारवंतीण

सारवासारवीचे दिवस

September 29, 2022
मी बाई विचारवंतीण

कोरस

September 16, 2022
मी बाई विचारवंतीण

गणपती इले…

September 1, 2022
मी बाई विचारवंतीण

दगडांच्या देशा…

August 4, 2022
Next Post

लोभाची विषारी फळे

ती सध्या काय करते?

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.