• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

२६ मार्च भविष्यवाणी

- प्रशांत रामलिंग (२६ मार्च ते २ एप्रिल २०२२)

प्रशांत रामलिंग by प्रशांत रामलिंग
March 25, 2022
in भविष्यवाणी
0

अशी आहे ग्रहस्थिती
राहू-वृषभेत, केतू-वृश्चिकेत, शनि -शुक्र-मंगळ -प्लूटो मकरेत, गुरु-नेपच्युन कुंभेत, रवि -बुध मीनेत, चंद्र धनुमध्ये, त्यानंतर कुंभ, मीन आणि अखेरीस मेषेत.
दिनविशेष – ३१ मार्च रोजी दर्श अमावस्या (प्रारंभ दुपारी १२. २२), २ एप्रिल रोजी चैत्रमासारंभ (गुढीपाडवा)

 

मेष – तुमची ग्रहस्थिती सुधारत चालली आहे. राहू-केतूचे राश्यांतर झाले आहे. त्यामुळे वडिलोपार्जित व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये निश्चितपणे वृद्धी होईल. सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुम्हाला स्पष्टवक्तेपणाचा काही ठिकाणी चांगला फायदा झालेला दिसेल. सरकार दरबारी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चांगला लाभ होईल. ऑर्डर, टेंडरच्या माध्यमातून धडाकेबाज कामे झालेली दिसतील. समाजात पत प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. काही कामाच्या निमित्ताने विदेशगमनाचे योग संभवतात. व्यवसाय-नोकरीच्या निमित्ताने प्रवास घडतील.

वृषभ – ज्या गोष्टीची अपेक्षा कराल, त्याची पूर्तता झालेली दिसेल. आठवड्यातील ग्रहस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. सट्टा, लॉटरी, शेअर मार्केट या माध्यमातून चांगली कमाई होईल. आर्थिक बाजू भक्कम होईल. मित्रमंडळी, ओळखीची मंडळी यांच्याकडून देखील आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. लेखकांना विशेष फायदा होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी खातेबदल, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या निमित्ताने परदेशगमनाची संधी मिळेल. स्थावर मालमत्तेमधून लाभ होतील. संततिसुख मिळेल. जामी जुमल्यातून लाभ मिळेल.

मिथुन – आपल्या आयुष्यात घडणार्‍या सकारात्मक घटनांचा अनुभव या कालावधीत येणार आहे. शनि-शुक्र -मंगळाचा विपरीत राजयोग होत आहे. भौतिक सुख सुविधांचा लाभ होईल. ज्या कामामध्ये हात टाकाल, त्यामध्ये हमखास यश मिळाले म्हणूनच समजा. कर्जाच्या समस्यांमधून सुटका होईल. सल्लामसलत कामाला येईल. पैशाची चिंता मिटेल. थकीत पैसे काही प्रमाणात वसूल होतील. नवदांपत्यांच्या संदर्भात पती-पत्नीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीतील व्यवसाय वाढीस लागेल, त्या निमित्ताने प्रवास घडू शकतो. सहकुटुंब धार्मिक कार्यात सहभागी होताल.

कर्क – येणारा आठवडा उत्तम जाणार आहे. २७ आणि २८ या तारखा विशेष लाभदायक ठरणार आहेत. मनासारख्या घटना घडतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. काही मंडळींना नातेवाईकांकडून कटू अनुभव येऊ शकतात. परदेशातील कामाच्या माध्यमातून विपुल धनलाभाची संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. कीर्तन-प्रवचन करणार्‍या मंडळींना आर्थिक धनलाभ होईल. घरात बंधूंकडून चांगले सहकार्य मिळेल. लेखक, पत्रकार, शिक्षक या मंडळींसाठी शुभदायक काळ आहे. नवीन घर, मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्की यश मिळेल.

सिंह – आगामी काळात आरोग्याची विशेष करून काळजी घ्यावी लागणार आहे. उन्हाचा कडाका वाढलेला आहे, त्यामुळे उकाड्याशी निगडित विकारांचा त्रास होण्याची शक्यता आहे. महिलांना ओटीपोटाचे त्रास होऊ शकतात. घरात बंधूंकडून चांगले सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी पुढारीपण, एखाद्या संघटनेचं पद भूषवण्याची संधी मिळेल. व्यसनापासून लांब राहाल तर ते फायदेशीर ठरेल. खास करून आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. अग्नी संदर्भातील उपकरणे जपून वापरा.

कन्या – परोपकार करण्याची संधी चालून येईल. राशिस्वामी बुधाचे राश्यांतर, सप्तमात रवी-बुध. समाजसेवक म्हणून काम करणार्‍या मंडळींना चांगला नावलौकिक मिळेल. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षण घेण्यासाठी चांगला काळ सुरु होत आहे. काही मंडळींना शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळेल. खेळाडू मैदान गाजवतील. २७ आणि २८ या दोन तारखा विशेष लाभदायक राहणार आहेत. कलाकार, गायक, दिग्दर्शक, या मंडळींना हा आठवडा एकदम मस्त जाणार आहे. राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या मंडळींना चांगले यश मिळेल.

तूळ – सरकार दरबारी आदर सन्मान मिळणार आहे. योगकारक शनि सुखस्थानात चतुग्रही. काही मंडळींच्या वडिलांना मान सन्मान मिळेल. गृहसौख्याच्या बाबतीत २७ आणि २८ तारखांना आनंदोत्सव साजरा करताल. कुंडलीत महायोग स्थापित होत आहे. राजकीय क्षेत्रात अथवा सरकारी क्षेत्रात काम करत असताल तर तिथे कामाच्या बद्दल प्रशंसा होईल. सुखप्राप्तीचा आठवडा. शुभदायक घटना घडतील. विवाह इच्छुक मंडळींसाठी चांगला काळ राहणार आहे. आपले शत्रू वाढणार नाहीत याची खबरदारी घ्या. नोकरीच्या ठिकाणी पगारवाढीचा योग आहे.

वृश्चिक – सर्व कार्य सिद्धीस जाणार आहेत. प्रत्येक कामामध्ये सकारात्मक परिस्थिती दिसेल. कामाच्या ठिकाणी उत्साह वाढलेला दिसेल. गरज पाहून निर्णय घ्या. स्पर्धात्मक वातावरणामुळे कष्ट पडतील पण यश नक्की पदरात पडेल. मित्र मंडळींचे सहकार्य लाभेल. पोलीस, लष्करात काम करणार्‍या मंडळींना मोठे साहस करायला लावणारा काळ राहणार आहे. त्यामधून नावलौकिक वाढेल. लेखकांकडून साहसी कथांचे लिखाण होईल. प्रवासात नव्या ओळखी होतील.

धनु – आर्थिक समस्यांमधून सुटका झाल्यामुळे सकारात्मक विचारांची मानसिकता निर्माण होणार आहे. भविष्यातील कामाच्या बाबतीत निर्णय दृष्टिपथात येण्याची प्रक्रिया सुरु होईल. आगामी काळात त्याचा चांगला फायदा झालेला दिसेल. राहू-केतूचे राश्यांतर अनपेक्षित धनलाभ देऊन जातील. नवीन घराचा विचार आकार घेईल. बांधकाम व्यावसायिक, अभियंते, एजन्ट या मंडळींना हा काळ लाभदायक जाणार आहे.

मकर – साडेसातीचा काळ असला तरी शनि-मंगळ-शुक्र यांच्यामुळे झालेल्या महायोगामुळे कार्य पार पडणार आहे. लाभेश मंगळाबरोबर योगकारक शुक्र चतुग्रही काही जणांना प्रत्येक कार्यात यश आणि नावलौकिक मिळवून देणारी ठरेल. अधिक पैसे कमवण्यासाठी नवनवीन उपाय कराल. कमिशनच्या माध्यमातून आर्थिक कमाई होईल. कर्ज मंजूर होतील. स्वपराक्रमाने नावारूपाला येण्यासाठी अनुकूल आठवडा आहे.

कुंभ – आत्तापर्यंत घेतलेले निर्णय चूक की बरोबर असे वाटत असले तरी येणार्‍या काळात तुम्ही केलेल्या कामाचा चांगला मोबदला तुम्हाला मिळणार आहे. साडेसातीचा दुसरा टप्पा आता लवकरच सुरु होणार आहे. काही मंडळींना विनाकारण खर्च झालेले पैसे पुन्हा मिळतील. व्यवसायाच्या नियोजनातही पैसे खर्च होतील. परदेशात व्यवसायाच्या निमित्ताने जाणे होईल. काही मंडळींना वडिलांचे पैसे वारसा हक्काने मिळतील. विध्यार्थ्यांना लाभदायक काळ राहणार आहे.

मीन – मार्च महिन्याचे अखेरचे दिवस म्हणजे २६ ते २८ हा काळ घबाड प्राप्तीचा. अपेक्षित असतील ती सर्व कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. गुंतवणुकीत टाकलेले पैसे दुप्पट होतील. त्यमुळे मानसिक आनंद मिळेल. तीर्थयात्रेच्या निमित्ताने प्रवास होतील. पैशाची उधळपट्टी टाळा. दान धर्म कराल. वैवाहिक सौख्यातून आनंद मिळेल. वकील मंडळींना अच्छे दिनचा अनुभव येईल. समाजसेवा करणार्‍या संस्थांना चांगले दिवस…

Previous Post

गोंदण

Next Post

भांग महोत्सव!

Related Posts

भविष्यवाणी

राशीभविष्य

May 8, 2025
भविष्यवाणी

राशीभविष्य

May 5, 2025
भविष्यवाणी

राशीभविष्य

April 25, 2025
भविष्यवाणी

राशीभविष्य

April 18, 2025
Next Post

भांग महोत्सव!

नया है वह

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.