ज्यांना नागराज माहिती आहे.. (सिनेमातला) त्यांच्या एका मर्यादेपर्यंत अपेक्षा पूर्ण होतात. हिंदीचा सामान्य प्रेक्षक दिपून जाईल…
पटकथेत सराईतपणा असला तरी ‘चक दे इंडिया’ डोकावतो..
…आणि वातावरणनिर्मितीमुळे ‘सलाम बाँबे’…
बच्चन साहेब हॅट्स ऑफ..
अजय अतुल ग्रेट..
कास्टिंग जबराट…
सगळीच चिखलातली कमळं आहेत..
त्यातही किशोर कदम.. मोठा कवी.. मोठा अभिनेता..
नागराज सहजपणे काळजाला हात घालतो…
सैराटचे नायक नायिका ज्या भूमिकेत दिसतात त्यावरून नागराजची टीम त्याच्यावरून जीव ओवाळून टाकते हे सिद्ध होतं..
या सिनेमांत नेहमीचा बॉलिवुड चकचकीतपणा अजिबात नाही, हा इतर यशस्वी दिगदर्शकांना धक्का आहे…
नागराज तिथे ग्रेट ठरतो…
हाऊसफुल्ल गर्दीने मध्यन्तरात टाळ्या वाजवल्या… ही कमालच..
मात्र शेवटपर्यंत सिनेमा गच्च धरून ठेवतो..
अंतःकरण टोचत जाणारी दुःखाची आणि दारिद्र्याची लहर सतत टोचत राहते.. त्यातून जीवनाशी सुरु असलेली लढाई, मुस्कटदाबी सतत दिसत राहते..
…बाबासाहेबांची जयंती अशा प्रकारे प्रथमच हिंदी सिनेमांत आली…
अलीकडच्या वेबसीरिजमधली गलिच्छ भाषा आणि सेक्सच्या आहारी जाण्याचा मोह नागराजकडे नाही हे माहितीच होते.. ते न दाखवताही दारिद्र्य खुपत राहते… हे नागराजने पुन्हा शाबीत केले…
आणि यातल्या सिनेमाभाषेमुळे सिनेमा दरिद्री लोकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेतो.. आणि त्यात ते पास होतात… हेही ग्रेटच…
तरीही
फॅन्ड्री.. ग्रेट
सैराट… प्रचंड लोकप्रिय
आणि
झुंड… कल्चर्ड
अर्थात तिन्ही भावंडे एकाच आईची असली तरी एकसारखी कधीच नसतात..
बघा ना..
राज कपूर… ग्रेट
शम्मी कपूर… लोकप्रिय
शशी कपूर.. कल्चर्ड
बाकी… ‘झुंड’ बघाच…
अशा बकाल वस्तीत राहून स्वच्छ राहणं किती कठीण..
हे माझ्याशिवाय कोण सांगू शकेल?..
धन्यवाद नागराज…
– पुरुषोत्तम बेर्डे