• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    भक्तघोषित विश्वगुरूंची अपयशी विदेशनीती!

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    टिंग टिंग भास्कर

    चायवाला का डरला?

    महाराष्ट्र टँकरमुक्त कधी होणार?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

लव्ह लेटर लिहू की…

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 4, 2022
in टोचन
0

माझा मानलेला परममित्र पोक्या याच्या भावी पत्नीने म्हणजे पाकळीने पोक्याला लिहिलेले प्रेमपत्र म्हणजे लव्ह लेटर जेव्हा पोक्याने मला वाचायला आणून दिले तेव्हा मी त्याला कडक शब्दात सुनावले, `पोक्या, तुला पाकळीने पाठवलेले प्रेमपत्र ही तुझी खासगी प्रॉपर्टी आहे. तो तुझा वैयक्तिक आनंदाचा ठेवा आहे. तो तू एन्जॉय कर, मला कशाला दाखवतोस?’
`हे बघ टोक्या, आपण दोघे जिवाभावाचे मित्र आहोत. एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी असलेले प्यारे दोस्त आहोत. आजपर्यंत सगळे धंदे आपण एकत्रच केले. करोडो रुपये कमावले. पैशासाठी आपल्यात कधीच वादावादी झाली नाही. उलट एकमेकांच्या संकटात वेड्यासारखे मदतीला धावलो. आनंद तर आपण फुल टू एन्जॉय केला. मग मला माझ्या भावी पत्नीने कळवलेल्या तिच्या भावना मला पाठवलेल्या प्रेमपत्रात व्यक्त केल्या तर ते पत्र मी तुला दाखवल्याशिवाय कसा राहीन? तू वाचून तर बघ. नंतर मी तिला काय लिहू, त्याचेही गाइडन्स कर…
`हे बघ, मी कधी कुणावर प्रेम केलं नाही करणार नाही आणि प्रेमपत्रही पाठवणार नाही. अरे, आधी प्रेमपत्र लिहिणारे असे प्रेमिक आणि प्रेमिका अनेकदा संसारात एकमेकांचा तोंडी उद्धार करतात तेव्हा तो आपण शेजारी-पाजारी ऐकत नाही का? त्यावरून तरी धडा घे, शब्दबंबाळ प्रेमापेक्षा अंतरीचा प्रेमाचा झरा कधी आटू देऊ नकोस. एकमेकांना कधीही अंतर देऊ नका, ते खरे प्रेम!’
`प्रेम न करता, प्रेमपत्र न लिहिता तू मला प्रेमाबद्दल एखाद्या प्रेमवीरासारखे लेक्चर दिलेस. याचा अर्थ तू कधीतरी कुणाच्या तरी शाळेत तरी प्रेमात पडला असशील असं वाटतं.’
`मुळीच नाही. ना. सी. फडक्यांपासून अनेक लेखिकांच्या प्रेमकथा वाचल्यात. त्या अनुभवातून बोलतोय.’
`तरीही पाकळीचं प्रेमपत्र वाच. निदान माझ्या आनंदासाठी तरी.’
`ठीक आहे. दे.’
मी पत्र वाचू लागलो…
प्रिय पोकेश्वर
तुला दहा फ्लाईंग किसची गोड सलामी. गाल स्वच्छ रुमालाने पुसून घे. नाहीतर लिपस्टिक गालभर पसरेल. त्या दिवशी तुझ्या रोमँटिक बोलण्याने हृदय इतके घायाळ झाले की रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही की झोपही लागली नाही. मग तू दिलेला तुझा फोटो पाहत तुझ्या आठवणीत कधी डोळा लागला ते समजलेही नाही. मी तशी फटकळ आहे, रागीष्टही आहे. मनात येईल ते फटकन बोलते. तुला आधीच कल्पना असावी म्हणून सांगितले. पण तुझ्या प्रेमात पडल्यापासून माझ्या कठोर बोलण्यात फरक पडला आहे. आता मला हळूहळू निसर्गाचे भानही येऊ लागले आहे. आता मी पाने, फुले, फळे, पक्षी यांचे जगणे आपलेपणाने बघते. आकाशातील चंद्र, सूर्य, तारे नव्याने अनुभवते. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीच्या प्रत्येक घटकाचे भान अनुभवते. त्यातील निरागस भावना, दुसर्‍याच्या आनंदासाठी केलेला त्याग पाहते. त्यामुळे माझ्यातील अहंकाराची पूर्वीची भावना नाहीशी होत चालली आहे. जगावे ते दुसर्‍याच्या आनंदासाठी असे विचार मनात रुंजी घालत असतात. हा दुसरा-तिसरा कुणी नसून तू आहेस. तुला सुखी करण्यासाठी मी जिवाचे रान करीन. मग आपण दोघे दुसर्‍यांच्या मदतीसाठी माणुसकीच्या नात्याने सर्वतोपरी सहाय्य करू. वाईट मार्गाने पैसा कमावण्याऐवजी चांगल्या मार्गाने पैसा मिळवू. मोठा उद्योग-व्यवसाय उभारून त्यात गरीब-मध्यमवर्गीयांना रोजगार मिळवून देऊ. तुझे मला सोडून इकडे तिकडे लक्ष जाणार नाही याची मात्र मी काळजी घेईन. तुला कविता लिहिण्याचा नाद आहे, याची मला कल्पना आहे. तूही मला कवितेतून किंवा गाण्यातून निखळ प्रेमपत्र लिही. ज्यामुळे माझ्या भावनांना प्रेमपंख फुटतील आणि मी भावी स्वप्नांच्या साम्राज्यात उड्डाण करीन. असो. टोकेश्वर भावजींना नमस्कार. तुझ्या प्रेमपत्राची वाट पाहात आहे. तोपर्यंत फक्त स्वप्नांच्या आकाशात बहरते आहे.
तुझीच लाडकी
पाकळी

प्रेमपत्र वाचून मी पोक्याच्या हाती दिले आणि म्हणालो, `भाग्यवान आहेस. आता दे तिला तिच्या म्हणण्याप्रमाणे उत्तर. लग्न होईपर्यंत दोघांनी प्रेमपत्राचा रतीब लावा.’
माझे म्हणणे खरे झाले. तिने तर दररोज प्रेमपत्र पाठवण्याचा नित्यक्रम सुरू केला. त्यामुळे पोक्यालाही स्फूर्ती आली. त्याच्यातला कवी जागा झाला. दुसर्‍याच दिवशी तिच्या पहिल्या प्रेमपत्राला त्याने उत्तर लिहिले. अगदी एक शेरापासून सुरुवात केली आणि नंतर प्रेमपत्र लिहिताना, तेही गाण्यातून- आपली काय मनस्थिती होतेय तेही लिहिले. त्याने लिहिले होते,
प्रिय पाकळीराणी
आसमां मे मत ढूँढ अपने सपनों को,
सपनों के लिए तो जमीं जरूरी है
सब कुछ मिल जाए तो
जीने का क्या मजा
जीने के लिए सिर्फ एक कमी है मेरे लिए
सिर्फ तेरी

लव्ह लेटर लिहू की प्रेमपत्र लिहू
की लिहू साधी चिठ्ठी आपली
माझी लाडकी म्हणू की माय डिअर म्हणू
तुला उपमा मी देऊ कसली?

गुलाबी कागद नि गुलाबी शाई
गुलाबी रंगाची सुंदर छपाई
गुलाबी प्रेमाची गुलाबी अक्षरे
लिहिताना का रुसली?

शब्द जुळवताना होते ही घाई
आठवलेलं सारं डोक्यातून जाई
शेरशायरी करू की कविता करू
साधी चारोळी नाही सुचली।।
हे लिहिताना राज कपूरच्या `संगम’ चित्रपटातील `ये मेरा प्रेमपत्र पढकर, तुम नाराज ना होना, तुम मेरी जिंदगी हो, तुम मेरी बंदगी हो’ या गाण्याच्या अगोदर असलेले त्या प्रेमवीराचे सुरुवातीचे शब्द होते.
मेहबूबा लिखू? या दिलरुबा लिखू?
इस खत में क्या लिखू?
असे स्वत:च्या मनाला विचारून प्रेयसीला कसली उपमा द्यावी या विचारात तो जसा गढला होता, तसा मीही गुरफटलो होतो. त्याची मनोवस्था माझी झाली होती. त्यावेळी डोळ्यासमोर फक्त तुझी मूर्ती होती. आणि मी कसा भराभर लिहित गेलो ते माझे मलाच कळलं नाही. प्रेमात पडल्यावर त्या दोघांची काय अवस्था होते, लग्न झाल्यावर काय अवस्था होते आणि पाच-दहा वर्षांनी काय अवस्था होते, याविषयी मी कधीतरी अशा प्रेमवीरांच्या आणि वीरांगनांच्या मुलाखती घेणार आहे. त्याचे पुस्तक काढणार आहे. म्हणजे नव्याने प्रेमात पडणार्‍यांना ते मार्गदर्शक ठरेल. तुझी प्रतिक्रिया कळव. आपले जरी अ‍ॅरेंज मॅरेज होणार असले तरी ते लव्ह कम अ‍ॅरेंज किंवा अ‍ॅरेंज कम लव्ह असे मॅरेज आहे. अशा प्रेमात एकमेकांच्या आवडीनिवडी जपल्या जातात. एकमेकांना समजावून घेतले जाते. एकमेकांचे स्वभाव कळतात. आपले असेच झाले. जाहिरातीत तुझ्या जगावेगळ्या अटी पाहून तुझ्यातले वेगळेपण मला जाणवले. आपले विवाहोत्तर प्रेम अधिक टवटवीत असेल याची खात्री मी तुला देतो. कारण लग्नाच्या आधी आपल्या प्रेमाची शोबाजी करणारे अनेक असतात. आपण त्यातले नाही, तरीही आपण प्रेमपत्रांचा सिलसिला चालू ठेवू आणि त्यात एकमेकांविषयी वाटणार्‍या भावना व्यक्त करत राहू. मी वेड्यासारखे काहीही लिहिले आहे. पहिलेच प्रेमपत्र असल्यामुळे तू समजावून घेशील याची खात्री आहे.
तुझाच
पोकेश्वर

Previous Post

५ फेब्रुवारी भविष्यवाणी

Next Post

नया है वह…

Related Posts

टोचन

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
टोचन

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
टोचन

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
टोचन

माननीय भुसे यांचे आत्मवृत्त

May 5, 2025
Next Post

नया है वह...

आतड्यापासून लिहिणारे अवचट

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025

राशीभविष्य

May 22, 2025

तोमार बाबा

May 22, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 22, 2025

ढोंगबाजी ट्रम्पची आणि…

May 22, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.