• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

अभ्यासोनि गुंतवावे धन!

- उदय कुलकर्णी (ओळख शेअर मार्केटची)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 24, 2022
in शेअर मार्केट
0

शेअर मार्केटमध्ये कधीही कर्ज घेऊन गुंतवणूक करू नये कारण कर्जाच्या व्याजापेक्षा जास्त नफा मिळेल याची हमी नसते. तसेच जी रक्कम पुढील पाच वर्षे लागणार नाही तीच शेअर मार्केटमध्ये गुंतवावी, याचं कारण, समजा अचानक ती रक्कम हवी आहे तर शेअर विकून ती जमा करावी लागेल, पण त्या वेळेला शेअर मार्केटची स्थिती कशी असेल याची खात्री नसते. कदाचित आपल्याला तोटा सहन करून विक्री करावी लागेल. दीर्घकालीन गुंतवणुकीचं महत्व सांगितलेले आहे, पण खूप नफा झाला असेल, मार्केटचे व्हॅल्युएशन अवास्तव प्रमाणात वाढलेले असेल तर नफावसुली करणेही आवश्यक आहे किंवा निदान स्टॉप लॉसचा वापर करणे चांगले आहे.

शेअर निवडण्याचे काही निकष बघितले. बहुतेक कंपन्या मोठे कर्ज घेऊन व्यवसायविस्तार करतात, त्यामुळे कर्ज घेणे ही वाईट गोष्ट नाही, परंतु त्या कर्जावरचे व्याज कंपनीने नियमित दिले पाहिजे, तितके उत्पन्न कंपनीने मिळवायला पाहिजे. व्यवसायविस्तारासाठी अवास्तव कर्ज घेतले आणि नंतर तो करता आला नाही. यामुळे बुडालेल्याही काही कंपन्या आहेत. कंपनीचे प्रमोटर कर्ज घेण्यासाठी त्यांचे शेअर तारण ठेवतात, तेसुद्धा प्रमाणात पाहिजे. त्यांच्या शेअर्सपैकी ८०-९० टक्के शेअर तारण ठेवले असतील, तर तो धोक्याचा इशारा आहे. हे सर्व निकष म्हणजे कडक नियम नाहीत. वाढीच्या मार्गावर असलेल्या चांगल्या कंपन्यांच्या शेअरना मार्केट खूप जास्त भाव देते, हे अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टवरून दिसेल. शेअर निवडताना त्या शेअरची खरेदी-विक्री किती प्रमाणात होत आहे म्हणजे त्याचा व्हॉल्यूम किती आहे हेही बारकाईने बघावे. फार व्हॉल्यूम नसेल, त्या शेअरचे किरकोळ संख्येत व्यवहार होत असतील तर आपण शेअर तर खरेदी करू शकू; पण विकायचे असतील तेव्हा विकत घेणारा कोणी नसेल. ट्रेडरनी तर व्हॉल्यूम किती आहे अवश्य बघावे.
शेअर मार्केटमध्ये व्यवहार करताना स्टॉप लॉसचे तत्व पाळणे फार आवश्यक आहे.
स्टॉप लॉस म्हणजे काय ते बघू. समजा आपण एका कंपनीचे शेअर खरेदी केले व काही कारणाने त्याचा भाव खाली यायला लागला, तर तोटा होत असेल तरीही ते विकून त्यातून बाहेर पडणे आवश्यक असते. म्हणजे भाव आणखी खाली खाली येऊन जो तोटा वाढत जातो तो निदान टळतो. उदाहरण बघू. क्रिधन इन्फ्रा या दोन रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरचा भाव जानेवारी २०१८मध्ये ११६ रुपये होता, मे २०१८मध्ये ९९ रुपये होता. इथपर्यंत ठीक होते. नंतर तो कमी होत जून २०१८मध्ये ७४ रुपये झाला, सप्टेंबर २०१८मध्ये ४७ रुपये झाला ते घसरत जाऊन ऑक्टोबर २०२०मध्ये फक्त २.५० रुपये झाला. इथून किंचित वाढायला लागला आणि आता ८ डिसेंबर २०२१ला ५.६० आहे. जर हा शेअर जानेवारी २०१८मध्ये ११६ रुपयाला खरेदी करतानाच ठरवले असते की भाव १० टक्क्यांनी कमी झाल्यावर विकून टाकू, तर भाव १०५ रुपये झाल्यावरच तो विकला असता आणि पुढचे १०५ ते आजचा भाव ५.६० म्हणजे ९९.४० रुपयाचे नुकसान टळले असते. दीर्घ कालावधीसाठी जे गुंतवणूक करतात, त्यांनी सहसा स्टॉप लॉस लेव्हल बघू नये. ती टेक्निकल पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्यांसाठी असते, अशी एक समजूत आहे. मात्र आता बदललेल्या परिस्थितीत ही लेव्हल दोघांसाठी उपयोगी आहे.
मुख्य मुद्दा आहे कंपनी कशी आहे, भाव खाली का आले ते बघून निर्णय घेणे. आयसीआयसीय बँकेसारखी चांगली कंपनी आहे, तिचा भाव खाली आला तरी दोन वर्षात तो वर जाऊ शकतो, पण क्रिधन इन्फ्रासारखी कंपनी असेल तर योग्यवेळी बाहेर पडणे आवश्यक असते. कंपनी तळात चालली आहे, तिच्या शेअरचा भाव वर येणार नाही हे स्पष्ट कळून चुकल्यावरही तिला चिकटून राहून आपण तोटा वाढवत राहतो, ते टाळले पाहिजे. प्रत्येकवेळी विकून टाकून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल असे नाही. कारण जोरदार विक्रीचा मारा सुरू होतो, खरेदीदार कोणी नसतो आणि लोअर सर्किट लागते. अशा शेअरना पेनी स्टॉक म्हणतात म्हणजे कवडीमोल शेअर. यात खेळणारेही काही असतात, पण त्यांचे मार्ग त्यांनाच लखलाभ. अशा शेअरबाबत आणखी एक धोका असतो. काही वाईट लोक आपापसात खरेदी करून अशा शेअरचे भाव कृत्रिमरित्या फुगवत नेतात, मग भोळे गुंतवणूकदार या शेअरकडे आकर्षित झाले आणि त्यांनी खरेदी सुरू केली की हे टोळके वरच्या भावात त्यांच्याकडच्या शेअरची विक्री करून टाकते. नंतर भाव खाली येतात आणि भोळे लोक त्यात अडकले जातात. त्यांचे नुकसान होते. अशिष्ट वाटेल पण या प्रकाराला पंप अँड डंप असे म्हणतात.
समारोप करताना काही गोष्टी बघू. कोरोनाच्या काळात मार्च २०२०मध्ये एक झटका खाल्यावर नंतर मात्र मार्केट वर जात राहिले व मोठी तेजी आली. याच काळात लाखो छोटे गुंतवणूकदारसुद्धा शेअर मार्केटकडे वळले आणि त्यांनी बहुतेक भरपूर नफा कमावला आहे. हात लावाल तिथे सोनं अशी स्थितीसुद्धा काहींची असेल. त्यामुळे कोणाला प्रश्न पडेल इतक्या सगळ्या अभ्यासाची, निकषांची वगैरे काय गरज आहे? याचं महत्त्व आहे जेव्हा मार्केट खाली येतं किंवा त्यात मंदी सुरू होते तेव्हा. योग्य शेअर घेतलेले नसतील, फंडामेंटल चांगले असलेल्या कंपनीचे शेअर नसतील तर ते झपाट्याने खाली येतात व नंतर वर जायला काही वर्षे लागतात. याविरुद्ध फंडामेंटल चांगले असलेल्या कंपनीचे शेअर कमी प्रमाणात खाली येतात व परिस्थितीमध्ये सुधार झाल्यावर ते लवकरच वरही जातात.
दुसरी गोष्ट, असे काही लोक बघण्यात आलेले आहेत ज्यांनी शेअर मार्केटमध्ये कधीच गुंतवणूक केलेली नसते, पण ते निवृत्त झाल्याबरोबर म्हणतात, आता मी शेअर मार्केटमध्ये उतरतो आणि फ्युचर्स अ‍ॅन्ड ऑप्शन्समध्ये गुंतवणूक सुरू करतो. काहीजण सांगतात की ते रोज ट्रेडिंग करतात आणि नफा कमावतात. छोट्या गुंतवणूकदारांनी प्राधान्याने इन्व्हेस्टमेंट म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीचा आधी विचार करावा. दीर्घकालीन गुंतवणुकीतून जास्त नफा मिळतो आणि संपत्ती निर्माण होते हे दिसून आलेले आहे.
ट्रेडिंग करायचे असेल तर त्याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. ट्रेडिंगचे टेक्निक शिकून घेणे, त्याच्यासाठी सॉफ्टवेअर मिळते ते वापरणे हे महत्त्वाचे आहे. फ्युचर्स अ‍ॅन्ड ऑप्शन्स हा सर्वात जास्त जोखमीचा प्रकार आहे. कमी भांडवलामध्ये जास्त रकमेचे व्यवहार करता येतात, यामुळे लोक त्याकडे वळतात, पण त्यात जसा जास्त नफा असतो तसेच जास्त जोखीमही असते. एकदम जास्त तोटा झाला तर तो सहन करण्याची क्षमता आहे की नाही याचा आधी विचार केला पाहिजे. दहा-बारा वर्षांचा कमावलेला नफा एका ट्रेडमध्ये गमावला असेही घडलेले आहे.
शेअर मार्केटमध्ये कधीही कर्ज घेऊन गुंतवणूक करू नये कारण कर्जाच्या व्याजापेक्षा जास्त नफा मिळेल याची हमी नसते. तसेच जी रक्कम पुढील पाच वर्षे लागणार नाही तीच शेअर मार्केटमध्ये गुंतवावी, याचं कारण, समजा अचानक ती रक्कम हवी आहे तर शेअर विकून ती जमा करावी लागेल, पण त्या वेळेला शेअर मार्केटची स्थिती कशी असेल याची खात्री नसते. कदाचित आपल्याला तोटा सहन करून विक्री करावी लागेल. दीर्घकालीन गुंतवणुकीचं महत्व सांगितलेले आहे, पण खूप नफा झाला असेल, मार्केटचे व्हॅल्युएशन अवास्तव प्रमाणात वाढलेले असेल तर नफावसुली करणेही आवश्यक आहे किंवा निदान स्टॉप लॉसचा वापर करणे चांगले आहे.
हळुहळू सुरुवात करत आपण समजा सात-आठ कंपन्यांचे शेअर घेतले तर ते सर्वच्या सर्व शेअर तोट्यात आहेत किंवा सर्वच्या सर्व नफ्यात आहेत अशी स्थिती क्वचित असते. काही शेअर तोट्यात व काही नफ्यात असतात व एकूण आपण किती नफा किंवा तोटा कमावला याचा विचार करायचा असतो. हे जे एकूण सात-आठ कंपन्यांचे शेअर आपल्याकडे आहेत त्याला आपला पोर्टफोलिओ म्हणतात. पोर्टफोलिओ म्हणजे आपल्याकडे असलेले एकूण शेअर. शेअर घेताना पोर्टफोलिओत विविध सेक्टरमधील शेअर राहतील असे घ्यावेत, म्हणजे एकाच सेक्टरवर अवलंबून राहण्यातील जोखीम कमी होईल. तसेच विविध मोठ्या. मध्यम अशा विविध आकाराच्या कंपन्यांचे शेअर घेण्याचाही विचार करावा.
शेअर मार्केट म्हटल्यावर सेन्सेक्स व निफ्टी हे दोन शब्द आपल्याला वारंवार ऐकू येतात. ते अनुक्रमे बीएसई (पूर्वीचे नाव बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) याच्याबरोबर संबंधित आहेत. सेन्सिटिव्ह इंडेक्सचे सेन्सेक्स हे संक्षिप्त रूप, ते एका पुणेकराने गमतीत दिले व रूढ झाले! बीएसईवर व्यवहार होत असलेल्या मोठ्या ३० कंपन्यांचे भाव आणि त्यांना दिलेले वेटेज यानुसार सेन्सेक्स किती आहे ते ठरते तर निफ्टी म्हणजे एनएसईवर व्यवहार होत असलेल्या मोठ्या ५० कंपन्यांचे भाव व त्यांना दिलेले वेटेज यानुसार निफ्टी किती आहे ते ठरते. सेन्सेक्स व निफ्टीमध्ये कोणत्या कंपन्यांचा समावेश करायचे व त्यांना किती वेटेज द्यायचे हे ते ते एक्सचेंज वेळोवेळी ठरवते. रोजच्या रोज मार्केटची स्थिती कशी आहे, जनरल मार्केट वर आहे की खाली ते या दोन निर्देशांकावरून कळते. मात्र सेन्सेक्स व निफ्टी खाली आलेले असले तरी त्यातील काही कंपन्यांचे किंवा त्यात समावेश नसलेल्या इतर कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढलेले असू शकतात. उलट सेन्सेक्स व निफ्टी वर पण काही कंपनीच्या शेअरचे भाव खाली अशीही स्थिती असू शकते.
आपण अभ्यासासाठी इतका वेळ देऊ शकणार नसू किंवा तितके जास्त पैसे आपल्याकडे नसतील तर थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक न करताही आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवणूक करावी. अनेक लोकांकडून पैसे जमा करून ते पैसे हे फंड मॅनेजर शेअर मार्केटमध्ये गुंतवतात. हे फंड मॅनेजर त्यातील तज्ज्ञ असतात. योग्य फंड निवडणे इतकेच आपल्याला करावे लागते.
शेअर मार्केटमधील गुंतवणूक हा फार मोठा विषय आहे. इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे. आता ब्रोकर फर्मच्या वेबसाईटवर इत्यादी ठिकाणीही माहिती मिळते. युट्युबवर व्हिडिओ असतात ते सर्वच चांगले नसतात. स्वतः प्राथमिक अभ्यास तरी करून, ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची आहे तिचा थोडासा तरी अभ्यास करून मगच गुंतवणूक करावी हा या छोट्या लेखमालेचा उद्देश.
गुंतवणुकीसाठी शुभेच्छा…

(टिप : ‘शेअर मार्केट – अभ्यास आणि अनुभव’ हे प्रस्तुत लेखकाचे पुस्तक २०१५मध्ये प्रकाशित झालेले असून
त्याचा उपयोग इथे केलेला आहे.)

समाप्त

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

चलो पकाते हैं खिचडी

Related Posts

शेअर मार्केट

गुंतवणुकीचे तीन निकष

June 23, 2022
शेअर मार्केट

शेअर कसे निवडावे?

January 13, 2022
शेअर मार्केट

शेअर निवडायचे कसे?

January 8, 2022
शेअर मार्केट

कोरोनाकाळाने शेअर बाजार फुलवला…

December 30, 2021
Next Post

चलो पकाते हैं खिचडी

बेपत्ता मुलाचं गूढ...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.