• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

अडीअडचणीतील भक्कम आधारस्तंभ

- आशा पारेख

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 21, 2022
in विशेष लेख
0
अडीअडचणीतील भक्कम आधारस्तंभ

शिवसेना चंद्रकलेप्रमाणे वाढत होती. त्यामागे बाळासाहेबांचे अथक परिश्रम, सामान्य जनतेसाठी त्यांनी केलेली कामं होती, हे मी पाहात होते. एक नि:स्वार्थी, प्रामाणिक नेते म्हणून ते माझ्याही मनावर ठसत गेले. बाळासाहेबांचे महाराष्ट्रभर चालणारे झंझावाती दौरे, त्यांची सूचक बोलकी व्यंग्यचित्रं पाहत होते. या एकाच माणसामध्ये किती कलांचे आश्रयस्थान आहे हे जाणवलं. १० पानांच्या मजकुरातून स्पष्ट होणार नाही इतकं बोधप्रद असं त्यांचं एकच कार्टून असे… ‘गागर में सागर’ म्हणतात, तशी त्यांची व्यंगचित्रं असत…
– – –

या घटनेला बरीच वर्षे झालीत. मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये माझा एक नृत्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाची संकल्पना होती ‘चौला देवी’. सभागृह तुडुंब भरलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आले होते महाराष्ट्रातील लाडके, जनमानसात लोकप्रिय असलेले नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! त्या दिवशी त्यांना मी प्रथमच प्रत्यक्ष भेटले…
कार्यक्रम संपला आणि चहापानासाठी प्रमुख पाहुणे, कार्यक्रमातील स्पर्धक, आयोजक सगळे एकत्र भेटले. आयोजकांनी माझा परिचय साहेबांशी करून दिला. त्या वेळेस बाळासाहेबांनी माझ्या क्लासिकल नृत्याची मुक्तकंठाने तारीफ केली आणि म्हणाले, फिल्मी डान्स नृत्यदिग्दर्शकाच्या इशार्‍यावर केला जातो, क्लासिकल डान्स मात्र शिकावा लागतो, त्यासाठी तपश्चर्या, आराधना आणि निष्ठा हवी. आपल्या देशाची ओळख आहे क्लासिकल डान्स आणि क्लासिकल संगीत… तुझ्याकडे या कला आहेत… त्यांना कधी अंतर देऊ नकोस… क्लासिकल नृत्याचा सराव करत राहा! बाळासाहेबांनी दिलेला हा आपलेपणाचा सल्ला मला त्याही वयात खूप धीराचा वाटला…
खरं म्हणजे माझ्या त्या वयात-त्या काळात बाळासाहेबांच्या हिमालयातल्या उत्तुंग कर्तृत्वाची कल्पना नव्हतीच… मी तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत नव्हतेच… मी भविष्यात कधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाईन आणि कधीतरी पुन्हा बाळासाहेबांच्या मदतीची मला गरज लागेल असं कधी स्वप्नातही वाटलं नाही. पुढे मी हिंदी फिल्म इंडस्ट्रीत आले, अभिनेत्रीच्या रूपात स्थिरस्थावर झाले. माझ्या क्लासिकल नृत्याचा रियाझ, नृत्याचे कार्यक्रम, शूटिंग्ज, मी, आई-वडील असं तिघांचं कुटुंब, माझी समाजसेवेशी निगडित कामं, आशा पारेख हॉस्पिटलची कामं, फिल्म इंडस्ट्री वेलफेयरशी संबधित कामं असे माझेही व्याप वाढत गेले. दुसरीकडे शिवसेना चंद्रकलेप्रमाणे वाढत होती. त्यामागे बाळासाहेबांचे अथक परिश्रम, सामान्य जनतेसाठी त्यांनी केलेली कामं होती, हे मी पाहात होते. एक नि:स्वार्थी, प्रामाणिक नेते म्हणून ते माझ्याही मनावर ठसत गेले. बाळासाहेबांचे महाराष्ट्रभर चालणारे झंझावाती दौरे, त्यांची सूचक बोलकी व्यंग्यचित्रं पाहत होते. या एकाच माणसामध्ये किती कलांचे आश्रयस्थान आहे हे जाणवलं. १० पानांच्या मजकुरातून स्पष्ट होणार नाही इतकं बोधप्रद असं त्यांचं एकच कार्टून असे… ‘गागर में सागर’ म्हणतात, तशी त्यांची व्यंगचित्रं असत…
बाळासाहेबांशी कधी ना कधी फिल्म इंडस्ट्रीच्या कामांसाठी मदतीसाठी भेट होत राहिली. त्यांच्या मातोश्री बंगल्याच्या
ड्रॉइंगरूममध्ये त्यांची भेट म्हणजे अनेक लोकल आणि ग्लोबल इश्युजवर मार्मिक विवेचन असे. अतिशय विद्वान, रोखठोक तरीही प्रेमळ असं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब. मुंबईच्या काँक्रिटीकरणाविषयी, बकाल वस्त्यांविषयी, वाढत्या महागाईविषयी बाळासाहेब अतिशय पोटतिडकीने बोलत. ‘व्होट बँकेसाठी बाळासाहेबांनी कधी खोटी आश्वासनं दिलीत असं घडलं नाही. आपल्या राज्यावर, राज्यातल्या नागरिकांवर निस्सीम प्रेम करणारे बाळासाहेब म्हणजे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते.
त्याच काळात सिने आर्टिस्ट असोसिएशनसाठी एका भूखंडाची आम्हाला आवश्यकता होती आणि त्यांच्या शब्दाने आमचे काम होईल याची खात्री होती. आणि त्याप्रमाणे त्यांची मदत मिळाली. माझ्याचप्रमाणे आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेकांनी बाळासाहेबांची भेट घेतलीये, बाळासाहेबांनी त्यांना मदत केली नाही असं घडलं नाही. प्रत्येक भक्ताने परमेश्वराचा धावा करावा आणि ईश्वराने साक्षात दर्शन द्यावे असं रूप, प्रचिती माझ्याप्रमाणेच अनेकांना येत असे. माझ्याच आशा पारेख हॉस्पिटलमध्ये असलेल्या कर्मचार्‍यांनी संप केला आणि मी अनेकदा मध्यस्थी, तडजोड करण्याचा प्रयत्न करूनही संप चिघळत गेला, यात रुग्णांच्या हालांना पारावार उरला नव्हता. मी हात टेकले आणि बाळासाहेबांच्या दरबारात पोहोचले. त्यांच्याकडे मदत मागितली. तेही त्या काळात निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यग्र असावेत. त्या काळात साहेबांची मदत मिळू शकली नाही. मी निराश झाले. पुढे काय करावं हा प्रश्न अनुत्तरित राहिला. पण अवघ्या काही दिवसांत बाळासाहेबांनी फोन केला आणि माझ्या कामात काही प्रत्यक्ष मदत करू शकलो नाही याबद्दल खंत व्यक्त केली. त्यांचा तो फोन म्हणजे मला धक्का होता. बाळासाहेब ज्या उंचीवर होते, तिथे त्यांची प्रतिमा इतकी मोठी होती, अशा नामांकित राजकीय नेत्याने स्वतः फोन करून माझे काम करण्यासाठी वेळ मिळू शकला नाही, अशी खंत व्यक्त करावी, हे त्यांच्यातील विनम्रता, सौजन्य आणि घरंदाज अदब दर्शवून गेलं… अनेक सद्गुणांची खाण म्हणजे बाळासाहेब होते.
बाळासाहेबांमुळेच सिने आर्टिस्ट असोसिएशनला हक्काचा निवारा मिळाला. त्याच भूखंडावर अनेक वृद्ध, असहाय कलाकारांना घरकुल मिळणार आहे. राज्यातील अनेक लक्षावधी गरजू व्यक्तींसाठी बाळासाहेब म्हणजे मोठा आधारस्तंभ होते. आयुष्यात जेव्हा ठेच लागली, मदतीची आवश्यकता भासली, तेव्हा बाळासाहेब नेहमीच मदतीसाठी तत्पर राहिलेत. त्यांचे ऋण शब्दांच्या पलीकडे होते!

शब्दांकन : पूजा सामंत

Previous Post

दूरस्थ अडगळीतल्या जातीजमाती जोडल्या…

Next Post

वाघासारखा मित्र, देवमाणूस!

Related Posts

विशेष लेख

आमच्या बाई

May 8, 2025
विशेष लेख

व्यंगचित्रांमधून तेवली विवेकाची ज्योत!

April 17, 2025
विशेष लेख

पिंजर्‍यातल्या पोपटांचे चावे आणि बोचकारे

April 17, 2025
विशेष लेख

आजारी आरोग्यव्यवस्थेवर उपचार कधी होणार?

April 17, 2025
Next Post
वाघासारखा मित्र, देवमाणूस!

वाघासारखा मित्र, देवमाणूस!

साहेबांची माया आणि प्रेमळ छाया!

साहेबांची माया आणि प्रेमळ छाया!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.