अमेझॉन प्राइम व्हिडीओवर 21 जानेवारीपासून दाखवल्या जाणाऱ्या ‘अनपॉज्ड’ या पाच लघुपटांच्या मालिकेतील एका म्हणजे ‘गोंद के लड्डू’ या लघुपटात ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी दिसणार आहेत. आपल्या भूमिकेबाबत आणि एकूणच या लघुपटाबद्दल बोलताना त्या म्हणतात, प्रत्येकाला एखादी छोटीशी संधी हवी असते. हेच दाखवण्याचा या लघुपट मालिकेचा उद्देश्य आहे. यात मी एक लघुपट केला आहे. यात मी एका वृद्ध स्त्रीची भूमिका केली आबे, जी या वयातही नवे तंत्रज्ञान शिकण्याचा जोरदार प्रयत्न करते आहे. हा लघुपट आजच्या कठीण काळातही सकारात्मक दृष्टी देतो हे मला फार महत्वाचे वाटले. प्रेक्षकांनाही हा लघुपट नवी उभारी देईल हे नक्की. दिग्दर्शिका शिखा माकन यांनीही ही भावना पडद्यावर छान चितारली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. “अनपॉज्ड : नया सफर” या लघुपट मालिकेत पाच वेगवेगळी कथानके पाहायला मिळतील.