• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

मदारी आणि माकडाचं पिल्लू

- धनंजय एकबोटे

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 7, 2022
in विनोदी लेख
0

स्वत:शीच बडबडत मदार्‍याने वळकटी सोडली, खांद्यावरची घोंगडी खाली टाकली, हातात डमरू घेतला आणि तारस्वरात ओरडला ‘चलो चलो बच्चा लोग, फिर आये है मदारी चाचा. चलो चलो, साथ में नया बंदर आया है.’ ओळखीची आरोळी ऐकताच कमळगल्लीमधील पोरंटोरं चड्डी सावरत मदार्‍याभोवती पिंगा घालत फेर धरून नाचू लागली. तसा मदारी दात विचकत हसला आणि इथे तरी आपला खेळ हिट होणार याची खात्री पटली.
‘मदारी चाचा, काल तुम्ही दुसर्‍या गल्लीत खेळ दाखवत होता ना?’
‘ए देखो, मी सर्व गल्ल्या पालथ्या घातल्या आहेत. एकही सोडली नाही. आज इथे, तर उद्या तिथे.’
‘आज काय खेळ दाखवणार मदारी चाचा?’ गर्दीतून पोरं ओरडली, तसा मदार्‍याला जोर चढला आणि दात विचकत हसून माकडाचं लहान पिल्लू पुढे करत म्हणाला, ‘ये क्या है बच्चौ.’
‘मदारी चाचा, बंदर का बच्चा’.
‘है क्या ना? तर ये माकड का बच्चा अब म्यांव म्यांव करके वरडेगा. जमुरे म्यांव वरडके बताओ. है क्या नाय चमत्कार?’
तसे पोरं शिट्ट्या मारू लागले आणि नागिन डान्स सुरू केला. मदार्‍याने माकडाच्या पिल्लाच्या बुडाला चिमटा काढला तसे पिल्लू कळवळून म्यांव म्यांव करू लागले. मदारी जाम खुश झाला आणि अभिमानाने पोरांकडे बघू लागला.
पोरटोरं जाम खूश झाली आणि फिदीफिदी हसायला लागली.
मदार्‍याने नवा खेळ दाखवायचा म्हणून काठी उगारली आणि पिल्लाला दरडावले, ‘जमुरे, तू शादी करेगा, शादी करेगा? भागाबाई आणू क्या तेरे लिये?
तसे माकडाचे पिल्लू खूश झाले व उड्या मारू लागले.
पोरंटोरं पुन्हा जाम खुश झाली आणि टाळ्या पिटायला लागली.
नंतर मदार्‍याने सपाटाच लावला. दोरीवरून पिलाला उड्या मारायला लावल्या. दोरीवरून चालायला लावले.
दुनिया में जीना है तो काम कर प्यारे,
काम कर, झुक कर सलाम कर प्यारे
वरना ये दुनिया जीने नहीं देगी,
खाने नहीं देगी, पिने नहीं देगी…!
तारस्वरात मदारी गात होता. एवढ्यात पिलाचा तोल गेला आणि ते खाली आदळलं. पिलू केकाटायला लागलं. हा पण खेळाचाच भाग आहे असं समजून पोट्ट्यांनी पुन्हा टाळ्या कुटायला सुरुवात केली. शिट्ट्या दिल्या. मदारी मात्र काळजीत पडला. पण काळजी कशीबशी लपवून पिलाला हातात वाडगा दिला.
‘चलो, अब पेटपानी की बात. जमूरे, जाओ और पैसा इकठ्ठा कर के लाओ. जाओ. बच्चा लोग पैसा देगा.’
पिलाने वाडगं हातात घेऊन चक्कर मारायला सुरुवात केली. पोरं फिदीफिदी हसायला लागली आणि टुक टुक माकड असे म्हणत धूम ठोकत कमळगल्लीत दिसेनाशी झाली.
मदारी खजील झाला. हातातली काठी जमिनीवर आपटली आणि रागाने पिलाकडे बघितलं. पिलू खांद्यावर चढून बसले आणि मदार्‍याचा कानाशी येऊन म्हणाले, ‘चचा, आपून का उद्योग अब कमी करना पडेगा, खेळ फेल चालला आहे. आता लघुउद्योग व सूक्ष्म उद्योगावर लक्ष केंद्रित करावे चचा.’
मदारी तोंडात मारल्यागत पिलाकडे बघत वळकटी खांद्यावर मारुन चालू लागला.

Previous Post

विघटनवादी कोरोनाचा नाश करण्याची संधी!

Next Post

गौरी ते घोड-नवरी

Related Posts

विनोदी लेख

पाटील

April 11, 2025
विनोदी लेख

वक्फ वक्फ की बात!

April 11, 2025
विनोदी लेख

आरोप सिद्ध झाला तर…

April 4, 2025
विनोदी लेख

शरण अंकल

March 28, 2025
Next Post

गौरी ते घोड-नवरी

१७व्या वर्षी संगीत नाटक, २०व्या वर्षी ३ कादंबर्‍या!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.