नाव : श्री. चंद्रकांत काशिनाथ पेंडभाजे
पत्ता : सी/१८, तळमजला, सत्य-विजय को.ऑप.हौ.सो.लि.,
सरदार प्रताप सिंग मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई-७८, महाराष्ट्र राज्य
वय : ७७ वर्ष, मो. ९३२०१५८३५९
व्यवसाय : निवृत्त (भांडुप शिवसेना शाखा क्र.११२)
‘मार्मिक’मध्ये काय आवडते? : सुंदर, आकर्षक, मनमोहक, मनोरंजनात्मक, सुशोभित `मार्मिक’ नावाप्रमाने मर्मावर बोट ठेवणारे, प्रबोधन करणारे साप्ताहिक पूर्वीची रविवारची जत्रा, म्हणजेच साहेबांचे फटकारे असे असेल तर ते जिवाला भावते. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
‘मार्मिक’मध्ये आणखी काय हवे? : मनोरंजन, विविध विषयांची माहिती याचबरोबर हिंदू धर्म, हिंदु संस्कृती, हिंदूच्या पारंपारिक चालीरीती, सण उत्सव व परंपरा, हिंदूराष्ट्र याविषयी लिखाणाद्वारे जन-प्रबोधन व्हावे हे हवे, ही सदिच्छा!
—————————————————————–
नाव : श्री. अशोक परशुराम परब
पत्ता : ए-१०२ थी साई दत्तगुरु को. ऑप. हौ. सो. पाटील वाडी,
सावरकर नगर ठाणे (प) ४००६०६
वय : ७२ व्यवसाय : सेवानिवृत्त, वृत्तलेखक, मुक्त पत्रकार
‘मार्मिक’मध्ये काय आवडते? : अथपासून इतिपर्यंत सर्वकाही विशेष आवडती सदरे
१. टपल्या आणि टिचक्या २. बाळासाहेबांचे फटकारे ३. व्यंगचित्रे ४. मस्करिका,
कुस्करिका, गावची गजाल, टमाट्याची चाळ, पंचनामा.
‘मार्मिक’मध्ये आणखी काय हवे? : वाचकांनी पाठविलेल्या विनोदांना नावासहित प्रसिद्धी द्यावी. `कसा पण टाका’ मध्ये जास्तीत जास्त प्रश्नांना प्रसिद्धी द्यावी. सर्वोत्कृष्ट प्रश्नाला दर आठवड्याला बक्षीस द्यावे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादे सदर असावे.
—————————————————————–
नाव : श्री. गुरुदत्त उर्फ गुरुदेव श्रीधराचार्य वरखेडकर
पत्ता : १) ४ साईनाथ कॉलनी काटोल रोड- नागपूर ४४००१३,
२) ३०१ सिल्हर ड्रीम, निअर डीएसके गणेश मंदिर, धायरी, पुणे -६८
वय : ६७
व्यवसाय : सेवानिवृत्त
‘मार्मिक’मध्ये काय आवडते? : १) प्रबोधन १००, २) टपल्या व टिचक्या, ३) मा. परमपूजनीय बाळासाहेब फटकारे, ४) टोचन
‘मार्मिक’मध्ये आणखी काय हवे? : १) शिवसेना शाखेचे वृत्त, २) मार्मिक फक्त शिवसेना माहिती असावे. ३) `शिवसेना’ सामाजिक कार्य
—————————————————————–
नाव : सुर्यकांत यशवंत चोपडेकर
पत्ता : खोली क्र. ४, श्री राम समर्थ कृपा चाळ, चाळ क्र. ६, अ, शिवनेरी नगर, मानखुर्द, मुंबई- ४०००४३
वय : ५७ वर्ष व्यवसाय : नोकरी
‘मार्मिक’मध्ये काय आवडते? : १. बाळासाहेबांचे फटकारे, २.टपल्या टिचक्या ३. पुरुषोत्तम बेर्डे यांचे विविध कलाकारांविषयी लेख, ४. पंचनामा या लेखातून थरारक कथा ५. काकदृष्टीद्वारे केलेली फोटोग्राफी ६. शब्दकोडे ७. अंकाच्या शेवटला आपल्या आयुष्यात घडणार्या घटनांचा आभास होणार्या विविध कथा ८. हृषिकेश जोशी यांना विचारलेले प्रश्न त्यांनी दिलेली त्या प्रश्नांची उत्तरे ९. साप्ताहिकामध्ये छोटे-मोठे विविध प्रकारचे उपहासात्मक विनोद १०. अंकामध्ये केलेली मांडणी ११. साप्ताहिकाच्या अंकावर कव्हरपेज वर येणारे व्यंगचित्र त्यातून त्या अंकामध्ये विषय काय आहे ते समजते.
‘मार्मिक’मध्ये आणखी काय हवे? : १. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्या गडकिल्ल्यांविषयी माहिती त्यांचा इतिहास, २. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे पर्यटनस्थान म्हणून महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न मार्मिकमधून साध्य करावा. ३. मार्मिकमधून व्यंगचित्राचे प्रशिक्षण देता येवू शकते हा याचा प्रयत्न करावा. ४. लहान मुलांना मार्मिकमध्ये जास्तीत जास्त आवड निर्माण करता येईल याचा प्रयत्न करावा. ५. मार्मिक साप्ताहिकात आठवड्यात घडून गेलेल्या क्रीडा प्रकाराची बातमी मार्मिकच्या स्वरुपात देण्यात प्रयत्न असावा. जय शिवराय…
—————————————————————–
नाव : पं. गुरुराज गणेश जोशी, आग्रा घराणा गायक
पत्ता : ए-४, कामधेनू को. ऑ. हौ. सो. पोस्ट ऑफिससमोर,
कळवा, ठाणे – ४००६०५
वय : ८६ वर्ष व्यवसाय : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, विद्यादान
‘मार्मिक’मध्ये काय आवडते? : साहित्य संगीत कलेला जीवन त्याग केलेल्या व्यक्तीचा परिचय
‘मार्मिक’मध्ये आणखी काय हवे? : १. राजकीय व्यंगचित्र अजून. २. कलाकार परिचय पाहिजे ३. जुनी नाट्य संगीत परंपरा ४. हिंदुस्थानी रागसंगीत परंपरा ५. नवीन ग्रंथपरिचय.