प्रधानमंत्र्याच्या नावाने गोळा केलेला पीएम केयर फंड (प्राईम मिनिस्टर केअर्स फंड) हा भारत सरकारचा निधी नसून एका धर्मादाय संस्थेचा निधी असल्याचे पीएमओकडून दिल्ली कोर्टात सांगितलं गेलेय. नाव वापरले पीएम केअर्स असे. त्यांना कोणताच अधिकार नाही की पंतप्रधानांचे नाव आणि सरकारी लोगोचा वापर करण्याचा…
डोमिनसुद्धा gov.in वापरला सरकारचा, सर्व बड्या उद्योगपतींना याच पीएम केअर्समार्फत टॅक्स माफ केला. सर्व सरकारी डोमिनवर याची जाहिरात केली. वरून या पैशाची आरटीआय कायद्यानुसार माहिती देणार नाहीत की ते करोडो रुपये कुठे खर्च केले, ते सांगणार नाहीत. लोकांना किती मोठा चुना लावला गेलाय, विचार करा…
दिल्ली उच्च न्यायालयात पीएम केअर्स फंडावरील प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, पीएमओचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप कुमार श्रीवास्तव यांनी न्यायालयाला सांगितले, ‘पीएम केअर्स फंड हा भारत सरकारचा निधी नाही, तो आरटीआयअंतर्गत आणला जाऊ शकत नाही.’
आता प्रश्न आहेत :
१) तो भारत सरकारचा निधी नाही तर मग त्याच्याशी पंतप्रधान हा शब्द का जोडला गेला आहे? त्याचे नाव मोदी केअर्स फंड असायला हवे.
२) हा भारत सरकारचा निधी नसेल तर सरकारी कर्मचार्यांचे वेतन का कापून या फंडात टाकण्यात आले?
३) तो खाजगी निधी असेल तर सरकारी संस्थांनी त्याला देणगी का दिली? कायदेशीररित्या, सरकारी संस्था कोणत्याही खाजगी निधीला देणगी देऊ शकत नाहीत.
४) तो खाजगी फंड असेल तर तो त्याच्या वेबसाइट gov.in वर का लिहिलेला आहे? कोणताही खाजगी फंड त्यांच्या वेबसाइटसाठी हे व्यासपीठ वापरू शकतो का?
५) तो खाजगी फंड असेल तर पीएमओचे अधिकारी
मॉनिटरिंगपासून कोर्ट केसेसमध्ये का जात आहेत?
असे हजारो प्रश्न आहेत, पण उत्तर गहाळ आहे. योजना स्पष्ट झाली असती तर आधीच अस्तित्वात असलेल्या पंतप्रधान मदत निधीमध्ये देणगी मागितली असती. पण तिथे खाते द्यावे लागेल, आरटीआय उत्तरे द्यावी लागतील, म्हणून एक वेगळा निधी तयार झाला आणि आता ते पळून जात आहेत खाते देण्यापासून. मी कधीही एक प्रामाणिक माणूस खाते देण्यास घाबरत असल्याचे पाहिले नाही..
——————–
याही वर्षी…
याही वर्षी
गर्भवती पुतलीबेनवर नजर ठेवूनच होता मामा!
जुना अनुभव असा की
मामा पंचाहत्तर वर्षे झोपला होता..
ते बाळ जन्म घेऊन
खूप मोठे होऊन त्याने कसले कसले
उद्योग केले होते!
आणि त्याची ख्याती कीर्ती पंचखंडात पोचली होती
अखिल विश्वात बाळाच्या कीर्तीचा डंका!
त्या कर्कश्य डंक्याने त्रासून मामा जागा झाला
त्या दिवशी त्याला गोळ्या घालून
मामाने कायमचे संपवून टाकले!
तरी ते बाळ पुनः पुन्हा जन्म घेतेच आहे
वाढतेच आहे, वाढून कसले कसले उद्योग करतेच आहे
हे लक्षात आल्यावर
मामा डोळ्यात तेल घालून
जागा राहू लागला
पुतलीबेनवर बारीक नजर ठेवू लागला
याही वर्षी मामाने दोन ऑक्टोबरच्या पहाटे
त्या नवजाताला आईपासून
खेचून
आपल्या दोन्ही हातांनी त्याचे पाय पकडून
खडकावर त्याचे डोके आपटण्यासाठी
वर वर उचलले
आणि याही वर्षी
ते बाळ विजेसारखे वरच्या वर निसटले
आकाश-पाताळ-पंचखंडात
सगळीकडे पसरले!
याही वर्षी
मामा त्याच्या कंसात रिक्त हस्ते परतला
– मोहन देस
——————–
घराणेशाहीची टेप घासत बसू नका!
आज सीएनजीच्या किंमतीत खूप मोठी वाढ झालीये, काल पेट्रोल, डिझेल पुन्हा नव्या उच्चांकाला पोहोचले, स्वयंपाकाचा गॅस अलमोस्ट १००० रूपयांना जातोय… भाज्यांचे भाव कडाडले, डाळीचे भाव भयानक वाढले…
महागाईचा कडेलोट आणि इकॉनॉमी मात्र संथ… ग्रोथ म्हणावी तशी नाही.. रिझर्व बँकेचा फंड वापरायची वेळ आली… डॉलर कडाडला.. रुपया घसर, घसर, घसरला!
बॉर्डरवर भयानक स्थिती आहे… गेल्या वर्षी गलवानमध्ये ३२ जवान गेले.. आपली शी यांच्याबरोबरची डिप्लोमसी कामी नाही आली…
आमचे पगार अर्धे, नोकर्या गायब..
पण अदानीची सम्पत्ती गेल्या एका वर्षात २६० टक्क्यांनी वाढली… असे आज टाइम्स ऑफ इंडियात आलेय…
नुसता दरवेळी भारतमातेचा एक नवा सुपुत्र पार्टी अध्यक्ष किंवा प्रधानमंत्री होऊन पुरेसे नाही आता… तो डिलिव्हर काय करतोय हा प्रश्न आहे..
तुमच्या घराणेशाहीविरोधातील धोरणाला आम्ही १०० टक्के पाठिंबा दिला आणि तुम्हाला २०१४मधे भरघोस बहुमत दिले.. आता तुम्ही गेल्या सात वर्षात काय डिलिव्हर केले, पुढे काय डिलिव्हर करणार, ते बोला! पुन्हा पुन्हा घराणेशाहीचा विषय घासत राहू नका.. सात वर्षे सत्ता तुमची आहे!