मन्या लंगडत लंगडत शाळेत उशिरा पोचला.
इंग्रजीचे चौखुरे सर ओरडले, ‘व्हाय यू लेट कम?’
इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, ‘सर, रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि वाटेत उभ्या बैलाने मला ढुशी मारली. मी चटकन् उडी मारली. त्यात माझा पाय मोडला. म्हणून उशीर झाला.’
सर पुन्हा ओरडले, ‘डोन्ट यू वॉच? धिस इंग्लिश क्लास गोइंग ऑन. डोन्ट टॉक मराठी, टॉक इन इंग्लिश!’…
हजरजबाबी मन्या म्हणाला, ‘सर देयर वॉज चिखलीफिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम, मारिंग मी शिंगडा, मेड मी लंगडा. सो आय लेट कम!’
सर म्हणाले, ‘ओके. व्हेरी गुड. टुडे केम तो केम. डोन्ट लेट कम टुमारो. नाऊ सिट अँड ओपन स्टडीज!’