• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे

टीम मार्मिक by टीम मार्मिक
August 18, 2021
in व्यंगचित्र
0
बाळासाहेबांचे फटकारे

स्व. बाळासाहेबांचा कुंचला म्हणजे राजकीय पुढार्‍यांची खुमासदार व्यंगचित्रे असा समज प्रचलित आहे… त्यांच्या काळातल्या राजकीय नेत्यांचं व्यक्तिमत्त्व हुबेहूब पकडणारी आणि त्यांच्या व्यंगांवर नेमकं बोट ठेवणारी रेषा बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उमटत असे, हे त्याचं कारण. पण सर्वसामान्य माणसांचं चित्रणही बाळासाहेब किती प्रत्ययकारी पद्धतीने करत आणि सामान्य माणसांच्या भकास आयुष्याचं कसं विरूप दर्शन घडवत, हे या व्यंगचित्रातून समजून जातं… स्वातंत्र्यदिनाचा सोहळा झाला आहे, सत्तापदस्थांनी, राजकारण्यांनी आणि जनतेनेही तो साजरा केला आहे. त्याच्या फाटक्या पताका अजूनही लोंबत आहेत आणि सफाई कर्मचारी या सोहळ्याचा कचरा साफ करत आहेत, त्यात सगळ्या मान्यवरांचे संदेश आहेत… त्या मोठमोठ्या शब्दांमधल्या, लालित्यपूर्ण, प्रासादिक संदेशांचं खरं मोल काय, ते या चित्रातून बाळासाहेबांनी लख्खपणे दाखवून दिलं आहे. यातलं कचरावेचकांचं व्यक्तिचित्रण किती सहृदयतेने केलेलं आहे, तेही पाहण्यासारखं आहे… काळ बदलला तरी फार काही बदललेलं नाही… फक्त कचरा आकर्षक झाला आहे… आता स्वातंत्र्यदिनाला लागोपाठ तीन वर्षं एक लाख कोटींच्या एकाच स्वप्नरंजक घोषणेचा शिळाच कचरा पडतो आहे…

Previous Post

पदके मिळवायची तर खरीखुरी समृद्धी यायला हवी!

Next Post

अश्वत्थाम्याच्या चिरंतन वेदनेचं भळभळतं गीत…

Next Post
अश्वत्थाम्याच्या चिरंतन वेदनेचं भळभळतं गीत…

अश्वत्थाम्याच्या चिरंतन वेदनेचं भळभळतं गीत...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.