• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

१४ ते २१ ऑगस्ट भविष्यवाणी

- प्रशांत रामलिंग

टीम मार्मिक by टीम मार्मिक
August 11, 2021
in भविष्यवाणी
0

अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, रवि कर्केत, मंगळ आणि बुध सिंहेत, शुक्र-चंद्र कन्येत, चंद्र नंतर तूळ, वृश्चिक आणि धनूमध्ये. केतू- वृश्चिकेत, शनी-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरू-नेपच्यून (वक्री) कुंभेत, हर्षल मेषेत.
१३ ऑगस्ट रोजी नागपंचमी, १५ तारखेला स्वातंत्र्यदिन आणि पतेती, १६ ऑगस्ट रोजी पारशी नववर्ष, १८ ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी आणि १९ ऑगस्ट रोजी मोहरम.
—-

मेष – या आठवड्यात काही कारणाने मन:स्वास्थ बिघडेल. त्याकडे बारीक लक्ष ठेवा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. राशीस्वामींचे पंचमातले भ्रमण संततीदृष्ट्या शुभ. विद्यार्थीवर्गाला आवडीच्या शिक्षणसंस्थेत प्रवेश मिळवताना कसरत करावी लागेल. १५ आणि १६ ऑगस्टनंतर विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. मंगल-बुध-राहू-केतू केंद्र योगामुळे मन अशांत राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. नोकरीत समाधान, पण, व्यापारी वर्गाला मात्र, हा आठवडा कटकटीचा जाईल.

वृषभ – गेल्या महिन्यापासून अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत. खाजगी अथवा सरकारी कामे तूर्तास पुढे ढकला. रवीचे १७ ऑगस्टनंतर होणारे राश्यांतर फायद्याचे राहील. राशीस्वामी शुक्राचे कन्या राशीतले पंचमातले होणारे भ्रमण फारसे अनुकूल नसले तरी कलाक्षेत्रात काम करणार्‍या मंडळींसाठी लाभदायी ठरणारे आहे. एखादे प्रेमप्रकरण जमण्याची शक्यता आहे. चतुर्थातल्या मंगळामुळे गृहसौख्यात तणाव निर्माण होतील. मात्र, गुरूकृपेमुळे सर्व ठीकठाक राहील.

मिथुन – अनेक दिवसांपासून रेंगाळलेला घरातला एखादा प्रश्न सुटण्यासाठी येणारा काळ चांगला आहे. या कामासाठी घरातील सर्व मंडळींचे सकारात्मक सहकार्य मिळेल. अगदी योग्य वेळ समजून वाद मिटवण्याची उत्तम संधी चालून आहे. १७ ऑगस्टनंतरचा काळ अनुकूल. घरातील वातावरण आनंदी राहील. घरासाठी पैसे खर्च होतील. विद्यार्थीवर्गाला अनुकूल काळ. नोकरीनिमित्त प्रवास होतील. व्यावसायिकांना शुभ काळ.

कर्क – अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी कामे १७ आणि १८ ऑगस्टनंतर मार्गी लागण्यास सुरवात होईल. सरकारी कामात खर्च झालेला वेळ आता सत्कर्मी लागणार आहे. वरिष्ठांमधले वाद आता निवळतील. मंगळाचे सिंह राशीतल्या भ्रमणामुळे अर्थाचा अनर्थ होईल. शब्द जपून वापरा. आठवड्याचा मध्यानंतर आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. भागीदार व्यावसायिकांनी व्यवसायातले निर्णय एकमताने घ्या, अन्यथा वाद होतील.

सिंह – राशीस्वामी रवीचे स्वराशीतले आगमन शुभशकुन करणारे असले तरी रवी, मंगळ, बुध युती यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडेल, स्वभाव खूप आक्रमक होईल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या, अन्यथा व्यावसायिक आणि कौटुंबिक वादाला तोंड द्यावे लागेल. सुखस्थानातले राहू आगीत तेल ओतण्याचे काम करतील. राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींना जनमानसाच्या विरोधास तोंड द्यावे लागेल. विद्यार्थीवर्गासाठी अनुकूल काळ.

कन्या – दळणवळण क्षेत्राशी संबंधित काम करणार्‍या मंडळींना हा आठवडा धावपळीचा जाणार आहे. राशीस्वामी बुधाचे भ्रमण खर्चिक राहील. व्यवसायानिमित्त परदेशभ्रमण शक्य. वक्री गुरूचे षष्ठातले भ्रमण यामुळे कोर्टकचेरी संदर्भातील एखादा निर्णय मार्गी लागेल. डोळ्यांची काळजी घ्या. शत्रू माघार घेतील. आर्थिक तडजोड स्वीकारा. पंचमातले शनीचे वक्री भ्रमण विद्यार्थीवर्गाला त्रासदायक.

तूळ – हा आठवडा मौजमजेत जाणार आहे. राशीस्वामी शुक्राचे व्ययातले भ्रमण होत असल्याने पैसे खर्च होणार आहेत. अनपेक्षित लाभामुळे आर्थिक आवक वाढेल. पैसे खर्च करत राहाल. घरातील व्यक्तींबरोबरचे वाद निवळतील. समजूतदारपणा दाखवलात तर सर्व काही ठीकठाक राहील. लाभातले मंगळाचे भ्रमण त्यामुळे अपेक्षापूर्तीचा काळ. जोडीदारापासून फायदा होईल. विद्यार्थीवर्गास शुभ आणि आनंदाचा काळ.

वृश्चिक – बरेच दिवसांपासून मागे लागलेल्या शुक्लकाष्ठातून तुम्हाला या आठवड्यात दिलासा मिळणार आहे. कोणतीही चर्चा सद्सद्विवेकबुद्धीने मार्गी लावा. लाभातले शुक्राचे भ्रमण अनपेक्षित घटनापूर्तीचे. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. राजकीय व्यक्तींना पदाचा लाभ होईल. जबाबदारीचे काम मिळेल. कलागुण दाखवण्यासाठी सुवर्णकाळ.

धनु – घरातील कुटुंबाचे स्वास्थ्य उत्तम ठेवण्याचे आव्हान तुम्हाला पार पाडावे लागणार आहे. वक्री शनि आणि प्लूटोमुळे कौटुंबिक स्वास्थ्य चांगले राहणे जरा अवघड दिसत आहे. मानमर्यादा सांभाळून राहा. विद्यार्थीवर्गाला कलागुणांच्या माध्यमातून, नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी, खेळाडूंना स्पर्धांमधून मानसन्मान मिळण्याचा काळ आहे.

मकर – साडेसातीचा काळ आहे. वक्री शनीची दशमस्थानावर वक्रदृष्टी असल्याने व्यावसायिकदृष्टया काही काळ त्रासदायक राहणार आहे. योगकारक शुक्राचे भाग्यातले भ्रमण फारसे अनुकूल राहणार नाही. आर्थिक आवक समाधानकारक राहील. जमिनीची काम करणार्‍यासाठी लाभदायक काळ. प्रवासात काळजी घ्या. लग्न झालेल्या मुलामुलींना सासरकडून लाभ मिळण्याचे योग.

कुंभ – अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे व्यवसायातील प्रश्न मार्गी लागणार आहेत. व्यवसायवाढीसाठी उपयुक्त काळ आहे. एखादी मोठी ऑर्डर मिळेल. व्यावसायिक-भागीदार संबंध उगाळत बसू नका. कौटुंबिक वाद विसरायचा प्रयत्न करा. विद्यार्थीवर्गास सुवार्ता कानावर पडतील. राजकीय व्यक्तींना फायद्याचा काळ. जोडीदाराबरोबरच्या संबंधातील आनंद व्दिगुणित होईल.

मीन – देवकार्यानिमित्त प्रवास करण्याचा मानस असेल तर तो दृष्टिपथात येईल. न्यायालयीन विषय मार्गी लागतील. कागदपत्रे सांभाळून ठेवा. षष्ठस्थानातले मंगळाचे भ्रमण आरोग्याची समस्या निर्माण करेल. पचनक्रिया बिघडेल. अ‍ॅसिडिटीचा त्रास असणार्‍या मंडळींनी आहारावर नियंत्रण ठेवा. मेंदूविकारांची योग्य काळजी घ्या, अन्यथा शस्त्रक्रियेचा प्रसंग उद्भवू शकतो. कामगारवर्गाशी वाद असतील तर ते विचारविनिमयाने मार्गी लागतील. गृहसौख्य लाभेल.

– प्रशांत रामलिंग

Previous Post

ख्रिस्ती घरात वाढलेली शिवसेना

Next Post

कसा पण टाका…

Next Post

कसा पण टाका...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.