• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

खरोखरच धन्यवाद मोदीजी!

संपादकीय 10 जुलै 2021

टीम मार्मिक by टीम मार्मिक
July 7, 2021
in संपादकीय
0

हल्ली पेट्रोल पंपांवर बोर्ड लागले आहेत. जगातला सगळ्यात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे हे फलक आहेत.
मोदीजींची ही गोष्ट फारच आवडण्यासारखी आणि अभिमान वाटण्यासारखी आहे. ‘जगात सगळ्यात उत्तम, सगळ्यात मोठं, सगळ्यात चर्चित’ असं काहीतरी असल्याशिवाय ते कोणत्याही विषयाला लांब काठीनेही शिवत नाहीत. कोरोनाकाळाची ‘जगात सगळ्यात बेजबाबदार हाताळणी’ असं आंतरराष्ट्रीय लांच्छन लागेपर्यंत ते थांबले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी करण्याचा ‘जागतिक विक्रम’ही त्यांनी प्रस्थापित केला. जगात कुठेही तरंगली नाहीत, अशी नदीत कोरोनाबाधितांची प्रेतं तरंगली. त्यानंतर मोदीजींनी थेट हात घातला तो ‘जगात सगळ्यात मोठ्या’ लसीकरण मोहिमेला. छोटीमोठी गोष्ट ते करतच नाहीत.
अनेकांना आठवत असेल की देशात सगळीकडे लसीचा खडखडाट असताना, कुठेही लस उपलब्ध नसताना लस महोत्सव जाहीर करून तो आयोजित करण्याचा विक्रमही मोदीजींच्या नावावर आहे… आताही लस उपलब्ध आहे का, सगळ्यांपर्यंत पोहोचते आहे का, गावोगाव, खेडोपाडी, घरोघरी जाऊन लस टोचण्याची आपली अनेक वर्षांची यंत्रणा होती, ती कार्यरत झाली आहे का, हे प्रश्न कुणी विचारायचे नाहीत. ते मोदीजींना तर पडत नाहीतच. ‘जगात सगळ्यात भारी’ हा शब्दसमुच्चय कानावर पडला की ते लगेच फोटोला उभे राहतात आणि बोर्डावर हजर होतात. लसीकरणाचा कार्यक्रम जमिनीवर राबवणार राज्य सरकारे, केंद्र सरकार लस पुरवण्याचं निहित कर्तव्य- आधी बरेच घोटाळे करून आणि गोंधळ घालून झाल्यावर- रडत खडत कसंबसं पार पाडणार आणि तरीही बोर्ड लागणार मोदीजींच्या आभाराचे. हे अनेक लोकांना पटत नाही. काही जण म्हणतात, आभारच मानायचे तर सर्वोच्च न्यायालयाचे माना. त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर लसीकरणाची मोफत मोहीम सुरूच झाली नसती. खासगी रूग्णालयांमध्ये पैसे मोजून लस घ्यावी लागली असती, त्यातही खरोखरची लस मिळाली असती की नाही याची खात्री नाही. अनेक सोसायट्यांमध्ये बनावट लसीकरण करणार्‍या टोळ्यांचा ‘आत्मनिर्भर लसीकरणा’चा गोरखधंदा उघड झालेलाच आहे. सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केली हे बरोबर, पण ते मोदीजींनी ऐकलं हे काय कमी आहे का? मुळात त्यांना कोणाचं काही ऐकून घेण्याची सवयच नाही. प्रश्न विचारलेले आवडत नाही. म्हणून ते पत्रकार परिषदही घेत नाहीत एकही. मुलाखती देतात त्या त्यांनीच काढलेले प्रश्न विचारणार्‍यांना. अशात सर्वोच्च न्यायालयाने काही सांगितलं, याचं कौतुक नाही, मोदीजींनी ते- जगात सगळ्यात मोठा लसीकरण कार्यक्रम असा बोर्ड स-फोटो झळकवण्याची संधी म्हणून का होईना, ऐकलं हे अधिक महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांचे आभार मानलेच पाहिजेत.
या आभाराच्या फलकाची काहीजणांनी टिंगल केली. एका व्यंगचित्रकाराने ‘यावेळी अमुक ठिकाणी पाऊस खूप पडला, म्हणून मोदीजींचे आभार’ असा उपरोधपूर्ण फलक तयार केला. मोदीजींच्या चाहत्यांचं प्रेम इतकं अलोट की त्यात त्यांना उपरोध वगैरे काही कळत नाही. मोदीजींच्या कौतुकाचा प्रत्येक शब्द ते खराच मानतात. त्यांनी खरोखरच पाऊस पडल्याबद्दल मोदीजींचे आभार मानणारे संदेश तयार केले आणि ते सोशल मीडियावर प्रसृत केले. ही इतकी निरागस बुद्धीची, सकारात्मक वृत्तीची माणसं आपल्या आसपास आहेत, असे हिरे आपल्यातच दडलेले आहेत, हे आज मोदीजींमुळेच आपल्याला कळलेलं आहे. त्याबद्दल मोदीजींना खरोखरच धन्यवाद दिले पाहिजेत.
जगातल्या सगळ्यात मोठ्या लसीकरणाबद्दल मोदीजींचे आभार मानणारे बोर्ड जगात बहुतेक सगळ्यात महाग दराने इंधन विकणार्‍या पंपांवर लागावेत, हाही एक काव्यात्म न्यायच आहे. (ही ‘जगात सगळ्यात महाग दराने इंधना’ची कल्पना मोदीजींना सांगू नका, ते आणखी एक बोर्ड लावतील आणि चाहते आणखी एक संदेश प्रसृत करतील.) १९७३ साली पेट्रोलचे दर सात पैशांनी वाढले तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते, दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी बैलगाडीतून मोर्चा काढला होता त्या ‘प्रचंड महागाई’च्या निषेधार्थ. २०१४ सालापर्यंत पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढले की स्मृती इराणी, स्व. सुषमा स्वराज यांच्यापासून अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुपम खेर वगैरे दारिद्र्यरेषेखालील नागरिकांपर्यंत सगळ्यांना कंठ फुटायचा. आज अशी वाढ दर दिवशी होते आहे. तरीही कुणी हूं की चूं करत नाही. कारण आता साक्षात मोदीजींचं सरकार आहे आणि बाजारात तेलाचे दर निपचीत पडलेले असतानाही मोदीजी पेट्रोलचे दर वाढवत असतील,
गॅस महाग करत असतील, तर ते काहीतरी विचार करूनच करत असतील, हे सर्वांना माहिती आहे, सर्वांना पटलेलं आहे. उद्या आपल्या कमरेला शिल्लक असलेला एकमेव कपडाही मोदीजींनी फेडला तरी तो कुठे ना कुठे भारतमातेचे अश्रू पुसायलाच फेडला असणार याचीही आपल्याला खात्री आहे. त्यामुळेच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर ग्राहक अभिमानाने सांगतो, पूर्वी माझ्या गाडीच्या टाकीत फक्त ५०० रुपयांचंच पेट्रोल बसायचं. आता मी त्याच टाकीत हजार रुपयांचं पेट्रोल भरतो. हे सगळं मोदीजींमुळेच शक्य झालं. त्यांच्याबद्दल मनात अतीव आभाराचीच भावना दाटून येते.
धन्यवाद मोदीजी, खरंच धन्यवाद.

Previous Post

‘वुमन ऑफ माय बिलीयन’ मेलबर्न फेस्टीवलमध्ये

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Related Posts

संपादकीय

रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

June 8, 2023
संपादकीय

बारसू पाकिस्तानात आहे काय?

May 5, 2023
संपादकीय

आता राष्ट्रीय जनगणना कधी?

April 27, 2023
संपादकीय

पुढे काय होणार?

April 20, 2023
Next Post

टपल्या आणि टिचक्या

तू परत येशील!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.