गायक कांचन मिना आणि गायक-गीतकार विवेक मिश्रा ही जोडी आधीचे दोन्ही म्युझिक अल्बम सुपरहीट झाल्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत. आता ते ‘थोडी सी जो पी ली है’ नावाचा पार्टी साँग अल्बम घेऊन आले आहेत. यापूर्वी त्यांनी ‘सजना वे सजना’ हा म्युझिक अल्बम दिला होता. या व्हिडीओला यूट्युबवर 10 लाख व्युवर्स मिळाले होते, तर फेसबुकवर त्याला 10 लाखांहून जास्त व्युवर मिळाले होते. सॅण्डी बीचवर सायंकाळच्या धुंद वातावरणात फिल्मावण्यात आलेला हा म्युझिक व्हिडीओ प्रत्येक पार्टीमध्ये हमखास वाजवला जाईल याची निर्नात्यांना खात्री आहे. सुटसुटीत हिंदी शब्द आणि तितकाच सहज ताल धरता येण्याजोगे संगीत यामुळे हे गाणे अप्रतिम झाले आहे यात वादच नाही. याच गायक, गीतकार जोडीचे ‘बाप्पा मोरया’ हा सोलो म्युझिक अल्बमही तुफान गाजला होता.