फेरीवाल्यांना दहा हजार रुपयांची कर्ज मदतीची पंतप्रधान स्वनिधी योजना मुंबईत पुन्हा राबविण्यात येईल, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभेत आज फेरीवाल्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी भाजप आमदार ऍड. आशीष शेलार यांनी मुंबईतील फेरीवाल्यांचा विषय मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरीवाल्यांना स्वनिधी योजना सुरू केली होती. मात्र मुंबई पालिका आयुक्तांनी त्याला सध्या स्थगिती दिली आहे. कोरोना काळात फेरीवाल्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला त्यांचे मोठे नुकसान झाले.
त्यामुळे त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदतीची गरज आहे. त्यामुळे ही योजना सुरू करा अशी मागणी आशीष शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना पुन्हा सुरू करण्यात येईल असे सांगितले.
सौजन्य : दैनिक सामना