पालिकेच्या देवनार, गोवंडी, मानखुर्द आणि चेंबूर विभागाची पुढील 40 वर्षांची पाण्याची चिंता मिटणार आहे. या विभागाच्या पाणीपुरवठय़ात सुधारणा करण्यासाठी खोदण्यात येणाऱया जलबोगद्याचा शुभारंभ पर्यावरण-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. या जलबोगद्यामुळे संबंधित विभागाचा 2061 पर्यंतचा काढीक पाणीपुरकठा सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2024 पर्यंत सुरू होईल.
पालिकेच्या या प्रकल्पात अमर महल ते ट्रॉम्बे निम्नस्तर जलाशय व पुढे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयापर्यंत जलबोगद्याचे खोदकाम करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पांतर्गत हेडगेवार उद्यान, आरसीएफ आणि अणुशक्ती नगर येथे सुमारे 81 मी. ते 110 मी. इतक्या खोलीची तीन कुपके बांधण्यात येत आहेत. या जलबोगद्याच्या बांधकामाचा कालावधी 72 महिन्यांचा आहे. प्रकल्प सल्लागार मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स लि. आणि कंत्राटदार मे. पटेल इंजिनीअरिंग लि. यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेता विशाखा राऊत, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, मुख्य अभियंता शि. बा. उचगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याने आतापर्यंत सुमारे 86 कि. मी. लांबीचे जलबोगदे बांधले असून करील दोन्ही जलबोगद्यांचे बांधकाम पूर्ण झाल्याकर जलबोगद्यांच्या लांबीचे शतक पूर्ण होईल. जलबोगदा बांधकामासाठी बोगदा खोदाई यंत्र देशात सर्वप्रथम पालिकेने वापरण्यास सुरुकात केली आहे.
शीक, परळ, कुर्ला, भायखळा विभागालाही फायदा
यावेळी पर्यावरण-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या अमर महल ते प्रतीक्षा नगर आणि पुढे परळपर्यंतच्या जलबोगद्याच्या बांधकाम प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या प्रकल्पांतर्गत हेडगेवार उद्यान, प्रतीक्षा नगर आणि परळ येथे सुमारे 101 ते 109 मी. खोलीचे तीन कुपके बांधण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या दोन कुपकांचे खोदकाम पूर्ण झाले असून परळ येथील कुपकाचे खोदकाम प्रगतिपथावर आहे. या जलबोगद्यामुळे मुंबई शहरातील एफ/दक्षिण क एफ /उत्तर तसेच अंशतः एल व ई विभागांच्या पाणीपुरवठय़ामध्ये सुधारणा होणार असून या विभागातही 2061 पर्यंतचा काढीव पाणीपुरकठा करण्यास हे जलबोगदे फायदेशीर ठरणार आहेत.
सौजन्य : दैनिक सामना