• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नवे माहिती तंत्रज्ञान धोरण अधिक गतिमान असणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 26, 2021
in घडामोडी
0
फडणवीसांनी चार वर्षे सत्तेचे स्वप्नच बघत राहावे, उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा टोला

उद्योग विभागाच्यावतीने नवे माहिती तंत्रज्ञान धोरण आखले जात आहे. हे धोरण पूर्वीच्या धोरणापेक्षा अधिक गतिशील असेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केला.
उद्योग विभागाच्यावतीने माहिती तंत्रज्ञान धोरण आखले जात असून त्याची रुपरेषा ठरविण्यासाठी आयटी क्षेत्रातील जाणकारांसोबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. नव्या आयटी धोरणाबाबत नॅस्का@म, सीआयआय़ व आयटी क्षेत्रातील आघाडीवरील कंपन्यांमधील 28 हून अधिक जाणकारांनी सूचना केल्या. या सर्व सूचनांचा साकल्याने विचार करून नवे माहिती तंत्रज्ञान धोरण आखण्यात येईल, असे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.

यावेळी उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

वर्क फ्रॉम होमला वाव
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेला अधिक वाव आहे. नव्या आयटी धोरणात याचा समावेश करावा. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, भागांत मोठय़ा प्रमाणात आयटी उद्योग विस्तारला आहे. येत्या काळात राज्याच्या ग्रामीण भागांत या क्षेत्राचा विस्तार करण्याचा मानस असून नव्या बदलांसह रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धनांवर अधिक भर दिला जाईल, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

 

सौजन्य : दैनिक सामना

Previous Post

केंद्राने राज्याचे थकवले 29 हजार कोटी तरीही आर्थिक गाडा सुरू

Next Post

शिर्डी साई संस्थानला खंडपीठाची नोटीस; 5 मार्चला सुनावणी

Next Post
शिर्डी साई संस्थानला खंडपीठाची नोटीस; 5 मार्चला सुनावणी

शिर्डी साई संस्थानला खंडपीठाची नोटीस; 5 मार्चला सुनावणी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.