• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मोदींचे ट्रम्पपेक्षाही वाईट हाल होणार, ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 25, 2021
in घडामोडी
0
मोदींचे ट्रम्पपेक्षाही वाईट हाल होणार, ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. मोदी हे सर्वात मोठे दंगलखोर आहेत. त्यांचे भवितव्य अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही वाईट असेल. हिंसा घडवून काहीही साध्य केले जाऊ शकत नाही, अशी सडेतोड टीका त्यांनी केली.

  • ममता बॅनर्जी बुधवारी हुगळी जिह्यातील शाहगंज येथील सभेत बोलत होत्या. त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीची सीबीआयने नुकतीच कोळसा तस्करी प्रकरणात चौकशी केली. या चौकशीच्या अनुषंगाने ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहांवर जोरदार हल्ला चढवला.
  • त्यांनी मोदींसाठी ‘दंगलखोर’, ‘राक्षस’ यांसारख्या शब्दांचा वापर केला. काही दिवसांपूर्वी भाजपने तृणमूल काँग्रेसला ‘टोलाबाज’ म्हटले होते. त्यालाही ममता बॅनर्जींनी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
  • पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप हा राजकीय संघर्ष वाढला आहे.

मोदी-शहा देशभर द्वेष पसरवताहेत!

पंतप्रधान मोदी आणि गृह मंत्री शहा हे दोघे संपूर्ण देशभर असत्य आणि द्वेष पसरवत आहेत, असा बेधडक आरोप ममता यांनी या वेळी केला. राज्यातील विधानसभा निवडणुकीत मी गोलकिपर राहणार आहे. तुम्ही एकसुद्धा गोल करू शकणार नाहीत. सगळे शॉट गोल पोस्टच्या वरून जातील, असेही ममता यांनी भाजपला सुनावले.

 

सौजन्य : दैनिक सामना

Previous Post

डोंबलाचं सोशल डिस्टन्सिंग, लोकलमध्ये दररोज 40 लाख प्रवासी

Next Post

केंद्राने राज्याचे थकवले 29 हजार कोटी तरीही आर्थिक गाडा सुरू

Next Post
केंद्राने राज्याचे थकवले 29 हजार कोटी तरीही आर्थिक गाडा सुरू

केंद्राने राज्याचे थकवले 29 हजार कोटी तरीही आर्थिक गाडा सुरू

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.