देशातील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱया ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आज अतिशय महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या भागातील बीडीडी चाळीमधील 272 भाडेकरूना नव्याने होणाऱया भव्य इमारतींमधील घरांच्या क्रमांकाचे ड्रॉ काढण्यात आले. आता या घरांच्या क्रमांकाच्या आधारावर करारपत्र तयार होतील.
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण मंडळाच्यावतीने ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. पहिल्या टप्प्यात ना. म. जोशी मार्गाकरील तेरा इमारती तोडण्यात येतील. त्यासाठी 272 भाडेकरू स्थलांतरित होत आहेत. या 272 रहिवाशांना नक्या पुनर्रचित इमारतींमध्ये नवी घरे दिली जातील. त्यासाठी नव्या इमारतींमधील घरांचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आले.
यावेळी पर्यटनमंत्री व मुंबई उपनगर जिह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, स्नेहल आंबेकर उपस्थित होते.
ना. म. जोशी मार्ग परळ येथे सुमारे पाच हेक्टर जागेकर एकूण 32 चाळी असून त्यामध्ये एकूण 2560 कुटुंबे रहात आहेत. या रहिवाशांची पात्रता निश्चित करण्यासाठी सक्षम प्राधिकरण म्हणून जिल्हाधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत 10 चाळींतील 800 भाडेकरूंचे पात्रतेबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून 607 भाडेकरू आतापर्यंत पात्र ठरले आहेत.
हा क्षण मुंबईसाठी महत्त्काचा आहे कारण मुंबईच्या जडणघडणीत बीडीडी चाळी एक महत्त्काचा घटक आहे. दोन ते तीन पिढय़ांना आश्रय देणाऱया या चाळी लककरच नवीन रूप धारण करतील आणि या प्रकल्पाच्या नियोजनातून मुंबई शहराची नगररचना देखील सुटसुटीत होण्यास मदत होईल. बीडीडी चाळींमधील भाडेकरू-रहिकाशांची हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम वेळेत व दर्जेदार होणार आहे. या प्रकल्पात येणाऱया तांत्रिक अडचणी शासनाने सोडविल्या आहेत. कोविडमुळे उद्भकलेल्या परिस्थितीमुळे घरांचे महत्व वाढले असून येत्या 5 वर्षात म्हाडाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात परकडणारी, दर्जेदार घरे सर्कसामान्यांना उपलब्ध करून द्यावीत.
– आदित्य ठाकरे, पर्यटन मंत्री