सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर आणि श्रीसंत यांनी आयपीएलमधील लिलावासाठी नोंदणी केली आहे. 2013 साली आयपीएलमध्ये बेटिंगप्रकरणी श्रीसंतवर सात वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उठल्यानंतर त्याने आयपीएलमध्ये लिलावासाठी नोंदणी केली आहे.
आयपीएल साठी एकूण 1097 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 283 परदेशी खेळाडू असून 814 खेळाडू हिंदुस्थानी आहेत. सर्वाधिक खेळाडू वेस्ट इंडीज असून त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी नोंदणी केली आहे.
अर्जुन तेंडूलकरने नुकतंच मुंबईसाठी खेळून क्रिकेट विश्वात पदार्पण केले आहे. अर्जुनची बोली 20 लाखांपासून सुरूवात होणार आहे. त्यानंतर श्रीसंताही आयपीएलच्या मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. आयपीएल लिलावासाठी त्यानेही आपली नोंदणी केली असून त्याच्या लिलावासाठी 75 लाख पासून सुरूवात होणार आहे. यंदा सगळ्यांची नजर हनुमा विहारी आणि आणि चेतेश्वर पुजारा या दोन खेळाडूंकडे असणार आहे, कारण ऑस्ट्रेलिया विरोधात या दोघांनी चांगली कामगिरी बजावली होती. गेल्यावेळी दोघांचा आयपीलमध्ये लिलाव झाला नव्हता.