दक्षिण कश्मीरमधील कुलगाम जिह्यातील शम्सीपोरा या भागांत दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहे. हिंदुस्थानी लष्काराच्या रोड ओपनिंगवर हा हल्ला करण्यात आला आहे. जखमी जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. लष्कराच्या प्रवक्त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. तर ग्रेनेड हल्ल्याच्या घटनेनंतर जवानांनी संबंधित परिसरास वेढा दिला व दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान एक जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचे लष्कराने सांगितले आहे.