पश्चिम रेल्वेने आता खासगी केशकर्तनालयांनाही परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण वातानुकुलित असलेले हे सलून उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. उपनगरीय रेल्वे हद्दीत प्रथमच अशाप्रकारे सलूनची सुविधा उपलब्ध होणार आहे.

मुंबई सेंट्रल, गोरेगाव, कांदिवली आणि बोरिवली स्थानकात प्रत्येकी एक केशकर्तनालय उभे राहणार आहे. त्यानंतर अंधेरी पूर्व व पश्चिमेला प्रत्येकी एक असे पाच स्थानकात ही सेवा असेल. याशिवाय सुरत स्थानकातही एअर कंडिशन्ड सलूनसाठी जागा देण्यात येणार आहे. पाच वर्षांसाठी हे कंत्राट दिले जाणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत ही सेवा देण्यात येणार आहे, असे पश्चिम रेल्वेने सांगितले.
सौजन्य : दैनिक सामना