शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना भवन येथे नुकत्याच झालेल्या ग्रंथालय कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाराष्ट्र ग्रंथालय सेनेची पहिली राज्य कमिटी जाहीर केली आहे. त्यानुसार संघटनेचे सल्लागार म्हणून शिल्पा अतुल सरपोतदार यांच्या तर राज्य अध्यक्ष म्हणून बी. जी. देशमुख यांच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे.
राज्य कमिटीचे पदाधिकारी म्हणून विजय पोकळे (बीड), संजय मोटे (संभाजीनगर), रवींद्र धुमाळ (कोल्हापूर), नीळपंठ टापरे (अमरावती), पी. एम. पाटील (जळगाव), सुभाष पाटील (धुळे), आत्माराम सस्ते (फलटण), बापूसाहेब जाधव (बीड), महंत प्रभाकरबाबा कपाटे (नांदेड), पंकज झुंजाड (गडचिरोली), दीपक देशमुख (परभणी), विकास भोसले (करमाळा), शांताराम गुंजाळ (सटाणा), संजय कोल्हे (यवतमाळ), शामराव धायगुडे (खंडाळा), शेख अन्सर (पंढरपूर), प्रकाश पाटील (सांगली), विठ्ठल जाधव (बीड), दिलीप पाटील (उदगीर), डॉ. प्रशांत पाटील (पारोळा), डॉ. अनिल पाटील (संभाजीनगर), विष्णू जगताप (फुलंब्री) यांच्या नवाची घोषणा करण्यात आल्याचे महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या सल्लागार शिल्पा सरपोतदार यांनी सांगितले.