खणखणीत शरीरयष्टी आणि दमदार अभिनय यासाठी अभिनेता शरद केळकर ओळखला जातो. आपली फिटनेसबाबतची आवड तो इन्स्टाग्रामवर अनेकदा चाहत्यांशी शेअर करत असतो. आताही त्याने एक व्हिडियो शेअर केला आहे. सध्या तो एखाद्या प्रोजेक्टसाठी तयारी करतोय. यामध्ये तो लाठीकाठी चालवण्याचं प्रशिक्षण घेताना या व्हिडीओत दिसतो आहे. यामुळे हा अभिनेता पुन्हा एकदा ऐतिहासिक सिनेमात दिसणार आहे याची फॅन्सना उत्सुकता लागली आहे. चाहते अर्थातच त्याच्या नवीन कौशल्याचं भरभरून कौतुक करत आहेत.
हिंदी सिनेमात तो नायक नसला तरी नायकापेक्षा तो लक्षात राहातो. अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लक्ष्मी’ या सिनेमात शरद केळकरच जास्त लक्षात राहिला होता. यात त्याने प्रथमच किन्नराची पाहुणी भूमिका केली होती. त्याने अभिनयात अक्षयला चांगली टक्कर दिली होती.