मुकी जनावरे आपल्यावर अवलंबून असतात. आपण दिलेल्या, टाकलेल्या अन्नावर ते जगतात. ते स्वत: अन्न बनवू शकत नाहीत. त्यामुळे आपण शक्यतो मुक्या प्राण्यांना मदत करायला हवी हे नक्कीच… अभिनेत्री उत्कर्षा नाईक हिलाही तसंच वाटतं. पण त्याबरोबरच तिचं या मुक्या जीवांवर खूप प्रेमही आहे. दंगल टीव्हीवरील ‘प्रेम बंधन’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली उत्कर्षा जितकी शक्य आहे तितकी प्राण्यांची मदत करत असते.
याबाबत सोशल माध्यमावर बोलताना ती म्हणते, मी प्राण्यांची काळजी घेते, त्यांची देखभाल करते. त्यांच्यावर योग्य उपचार होतील हे बघते. मी कुठल्या स्वयंसेवी संस्थेची कार्यकर्ती नाही, पण मला ते मुळातच करावंसं वाटतं. म्हणून मी लोकांनाही आग्रह करते की, कृपया जनावरांची मदत करा. त्यांना काहीतरी खाऊ घाला. ज्या भटक्या प्राण्याला उपचारांची गरज असेल तर तशी व्यवस्था करा. एखाद्या एनिमल वेलफेयर संस्थेशी संपर्क साधा असेही ती स्पष्ट करते.