यंदाचा प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन साजरा होणार असून शाळा-महाविद्यालय स्तरावर ऑनलाइन वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, देशभक्तिपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच प्रभात फेऱया, सांस्पृतिक कार्यक्रमाचे आयोजन न करता सोशल मीडियाद्वारे निवडक विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यातल्या बहुसंख्य भागात नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत, तर 15 जानेवारीपर्यंत मुंबई, ठाणे, वर्धा, जळगाव जिल्ह्यातील शाळा बंद आहेत.
या शाळा बंद असल्या तरी शिक्षकांच्या उपस्थितीचे प्रमाण 50 टक्के आहे. 26 जानेवारी रोजी या शिक्षकांच्या शाळेतील उपस्थितीविषयी कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचे टीचर्स डोक्रॅव्रॅटिक फ्रंटचे राजेश पांडय़ा यांनी सांगितले. ज्या शाळा सुरू आहेत त्यांनी ध्वजवंदनाचा कार्यक्रम करावा की नाही, याविषयी कोणत्याही सूचना शाळांना देण्यात आलेल्या नाहीत.