छोट्या पडद्यावर ‘भाभीजी घर पर है’ ही मालिका अफाट लोकप्रियता आहे. या मालिकेत गोरी मॅम म्हणजेच अनिता भाभी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन हिने ही नुकताच मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता यापुढे मालिकेत अनिता भाभी म्हणून कोण दिसणार ही चर्चा रंगली होती. पण ही चर्चा आता थंडावली आहे. कारण मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे आता अनिता भाभीच्या रुपात छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
काही महिन्यांपूर्वी मालिकेचे निर्मात्यांनी नेहाशी या भूमिकेबाबत संपर्क साधला होता, पण तेव्हा संपर्क झाला नाही. मग ते दुसऱ्या अभिनेत्रीच्या शोधात होते. पण पुन्हा त्यांनी चार महिन्यांनी नेहाशी संपर्क साधला तेव्हा नेहानेही त्यांना होकार कळवला. आता लवकरच नेहा या मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा करणार आहे. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत शुभांगी अत्रे, रोहिताश गौड आणि आसिफ शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता गोरी मॅम बनून नेहा पेंडसे या मालिकेत काय धमाल करते ते पाहूया.