आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजारत जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला. निर्देशांक 48 हजाराचा आकडा पार करून गेला. मंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 241 अंकांची बढत घेत 48,109 वर खुला झाला. सेंसेक्सने पहिल्यांदा 48 हजार आकडा पार केला आहे तर निफ्टी देखील 14 हजारच्या पुढे गेला आहे.
नेशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 86 अंकांच्या वाढीसोबत 14,104.35 वर खुला झाला. तर शेअर बाजारात निर्देशांक 48,168.22 पर्यंत पोहचला आहे. तर निफ्टी 14,114.15 पोहोचला आहे. सकाली 11 नंतर निर्देशांक 150 अंक घसरला आहे.
सौजन्य : दैनिक सामना