कुठलाही सण, उत्सव हा आपल्या आनंदासाठी असतो. म्हणूनच केवळ आपले हिंदूंचेच सण नव्हे, तर इतर धर्मियांचे सण साजरे करतानाही आपल्या मनात पूर्वीच्या अनेक आठवणी दाटून येतात. दरवर्षी तो सण साजरा करताना आपल्याला त्या गोड क्षणांची आठवण येते. सध्या जगभर ख्रिसमसचा उत्साह आहे. यानिमित्त सोशल मिडीयावर पोस्टच्या माध्यमांतून चाहत्यांच्या सतत संपर्कात राहणारी अभिनेत्री अमृता सुभाष हिनेही एक खास पोस्ट केली आहे.
यंदा नाताळच्या दिवशी अमृता एका सेटवर आहे, पण ती वेबसीरीज आहे की सिनेमा हे मात्र समजू शकलेले नाही. ख्रिसमस सेलिब्रेशनचे सेटवरचे फोटो छान फोटो शेअर करत अमृता म्हणते, ‘प्रत्येक नाताळ काहीतरी मोलाचं घेऊन येतो. मागच्या वर्षी मी एका सिरिजच्या सेटवर होते जी लवकरच तुमच्या भेटीला येते आहे. मग मी माझ्या आवडत्या नाटकाच्या तालमीत होते… यावर्षी आज मी एका सेटवर आहे. फार चांगले लोक, आवडीची भूमिका. मी कृतज्ञ आहे… नाताळच्या शुभेच्छा!!’