शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती आता ठणठणीत असून त्यांनी दैनंदिन कामासही सुरुवात केली आहे. शिंदे यांच्या गाडीला वाशी खाडीपुलावर गुरुवारी अपघात झाला होता.
एकनाथ शिंदे हे गुरुवारी नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यांची गाडी वाशी टोलनाका ओलांडून खाडीपुलावर आली असता त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात गाडीचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत सुदैवाने शिंदे यांना मोठी दुखापत झाली नाही केवळ त्यांच्या हाताला आणि अंगठय़ाला किरकोळ मार लागला. या दुर्घटनेनंतर ते दुसऱया गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. शिंदे यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांनी शुक्रवारपासूनच कामाला सुरुवात केली असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
सौजन्य- सामना