प्लास्टीकमुळे प्रदुषणाची किती हानी होते ते सर्वांना माहीतच आहे. हे घातक प्लास्टीक जमिनीत विरघळून जात नाही. त्यामुळे पिकांनाही ते घातक ठरते. पोटात गेले तर त्याचे पचनही होत नाही. प्लास्टीकच्या याच घातक गुणधर्मांमुळे सरकारने त्यावर बंदी घातलीही आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये. अभिनेत्री तापसी पन्नू हिने मात्र ती अमलात आणायला सुरूवात केली आहे. तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लुप लपेटा’ या सिनेमाच्या सेटवर निर्मात्यांनी प्लास्टीकच्या बाटल्या दूर करून स्टीलच्या बाटल्या ठेवल्या आहेत.
तापसीनेही स्टीलच्या बाटलीतून पाणी पितानाचा आपला फोटो आजच इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. त्या पोस्टखालीच तिने ही माहिती दिली आहे. ‘लुप लपेटा’ सिनेमाच्या सेटवर आम्ही प्लास्टीक मुक्ती केली आहे.य, असे कॅप्शन तिने दिले आहे. ‘रन लोला रन’ या इंग्रजी सिनेमावर आधारलेल्या ‘लुप लपेटा’ या सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे. सोनी पिक्चर्स, एलिप्सिस एन्टरटेन्मेंट (तनुज गर्ग, अतुल कसबेकर) आणि आयुष महेश्वरी यांनी संयुक्तपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे. दरम्यान तापसी पन्नू ‘रश्मी रॉकेट’ या आपल्या सिनेमावरही प्रचंड मेहनत घेतेय. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत या मेहनतीबद्दल अपडेट दिली आहे.