जगाचे सर्च इंजिन अशी ओळख असलेल्या ‘गुगल’च्या सेवा डाऊन झाल्या आणि कोटय़ावधी युजर्सला फटका बसला. गुगलची जी-मेल सेवा, यु-टय़ूब, मॅप्स, हँगआऊट यामध्ये एरर आले. हिंदुस्थानपासून अमेरिकेपर्यंत या सेवा हँग झाल्या होत्या.
सायंकाळी 5.20ला एरर येण्यास सुरुवात झाली. तासभर 6.20 पर्यंत गुगल सेवा ठप्प होत्या. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने 50 मिनिटांनंतर गुगल सेवा सुरू झाल्यानंतरही एररची समस्या जगभरात पूर्णपणे संपली नव्हती. यु-टय़ूब, जी-मेल युजर्सना अॅक्सेस करताना समस्या जाणवत होत्या. लॉगइन केल्यानंतरही ‘Something Went Wrong’ हा मेसेज वाचावा लागला. दुसऱया बाजूने सर्च इंजिन ‘गुगल’ सुरू होते; पण ‘गुगल’च्या सेवांना एरर होता.
जी-मेल, यु-टय़ूब, मॅप्स हँगआऊटला फटका
20 हजार तासांचे व्हिडीओ यु-टय़ूबवर अपलोड झाले नाहीत. 1 मिनिटात 500 तासांचे व्हिडीओ एरव्ही अपलोड होतात.
जी मेलवर प्रत्येक मिनिटाला 11 हजार कोटी युजर्स मेल पाठवतात. त्यामुळे 50 लाख कोटी ई-मेल गेलेच नाहीत.
यु-टय़ूब एक मिनिटात तब्बल 23.53 लाख रुपये कमावते. गुगल डाऊन झाल्यामुळे 9.41 कोटींचे नुकसान झाले.
सौजन्य- सामना