• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय नो नेव्हर

संतोष पवार

Marmik Team by Marmik Team
November 27, 2026
in भाष्य
0
नाय नो नेव्हर

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच म्हणाले की मी आवाहन केल्यामुळे भारतीयांनी सोनेखरेदी केली नाही, त्यांची मोठी बचत झाली. ते सर्वांना एकच वेळ जेवण्याचं आवाहन कधी करतील? म्हणजे मग अन्नधान्याची केवढी बचत होईल ना!-अनुराधा पाटील, छत्रपती संभाजीनगर
आताही सगळेच दोन वेळ जेवतात असं वाटतं की काय तुम्हाला? की अर्धपोटी राहणाऱ्यांच्या उपासमारीचंही क्रेडिट घ्यायला पंतप्रधानांनी पुढे यायला हवं, अशी मागणी आहे तुमची? कधी, कुठलं क्रेडिट घ्यायला पुढे यावं हे तुम्हाला कळत नसेल, पण त्यांना बरोबर कळतं… उगाच विरोध करायचा म्हणून विरोध करू नका.. लिब्रांडू आहात का?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशात जाऊन, आमचं सरकार आहे म्हणून चौपाटीवर छठपूजा साजरी झाली याची कौतुके सांगतात? महाराष्ट्राने नेमका कोणता नवस बोलल्यामुळे आपल्याला हे मुख्यमंत्री लाभले असतील?-नितेश रानडे, बदलापूर
हे त्यांनीच केलंय, असं त्यांचे विरोधक महाराष्ट्रात बोलतायत, विरोधक युपीत जाऊन सांगू शकत नाही म्हणून बिचारे स्वतः यूपीमध्ये जाऊन बोलतायत.. कोणीतरी छटी माईलाच नवस केला असेल आणि महाराष्ट्राचा ‘देव’ यूपीवाल्यांना पावला असेल. पण म्हणून तुम्ही यूपीच्या कुणा बाबा-बिबाला नवस करायला जाऊ नका, उगाच तुम्हालाच देव देव करावं लागेल… मग यूपीवाल्यांना पावणारा देव आपल्याला पावेल की नाही हे आपल्याला माहित नाही.

मराठी नाटकांना भरभरून प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभतो आणि मराठी सिनेमांची थिएटर मात्र ओस पडतात. असं का होत असेल असं तुम्हाला वाटतं?-संतोष पांडे, ठाणे
हे म्हणजे तुम्ही आम्हाला पाण्यात राहून मगरमच्छशी वैर करून घ्यायला लावताय.. लक्षात ठेवा, तुम्ही आम्हाला काही विचारायचं नाही, काही सांगायचं नाही, आम्ही आमच्या माणसांचंही ऐकत नाही, आम्ही करतो तोच सिनेमा आहे, बस… आम्हाला एवढंच माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना जबरदस्त उत्तरं देत असताना आपल्यालाही आता अशीच तडाखेबंद उत्तरं द्यावी लागतील म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भर मंचावर उडालेली भंबेरी तुम्ही पाहिली की नाही संतोषराव? घ्याल का यापुढे विश्वगुरूंबद्दल शंका?- विनोद देशपांडे, अमरावती
आम्ही काय तुम्हाला टेलीप्रॉम्प्टर बघून उत्तरं देणारे वाटतो का? आम्हाला त्यांच्याबद्दल कधीच शंका नव्हती, उलट पूर्ण खात्री होती, आहे आणि राहील. आता या उत्तरावर, कसली खात्री? असा खत्रुड प्रश्न विचारायचा नाही.
आमच्याकडे कडाक्याची थंडी पडू लागली आहे. शरीर गरम ठेवण्यासाठी काय उपाय करावा? शेकोटी करावी, नरम रजई शोधावी, गरम पाणी प्यावे की त्यातून रम किंवा ब्रँडी प्यावी की यापलीकडचा एखादा आणखी परिणामकारक उपाय तुम्हाला माहिती आहे?- केतन पावशे, इंदापूर
हे सर्व उपाय करूनही थंडी आवरत नसेल तर सोबतीला कुणाला तरी घ्या, कशाला म्हणजे? शेकोटी, गरम पाणी, रम-ब्रँडी शेअर करायला, गप्पा मारायला. जेणेकरून थंडीकडे दुर्लक्ष होईल.. सूचना : तुम्ही जे उपाय करताय असं म्हणालायत त्यापैकी रजईचा उल्लेख आम्ही केलेला नाहीये… आणि तो उल्लेख का केलेला नाहीये हे जर तुम्हाला कळलं नसेल तर तुमचा प्रॉब्लेम थंडी हा नाहीये.. आणि तो सांगायला आम्ही डॉक्टर नाहीये!

ज्यांना धड मराठी लिहिता वाचता येतं की नाही याबद्दल शंका आहे, ते भक्त लोक एक जाडजूड आणि तेही इंग्लिश पुस्तक का खरेदी करत असतील? जाहीरपणे फाडण्यासाठी का होईना, पण पुस्तक खरेदी केलं तरी त्यातून लेखकाला, प्रकाशकाला फायदाच होतो, हे यांना कळत नसेल का?-सुबोध जोशी, देवगड

तुम्हीच म्हणताय त्यांना लिहिता वाचता येत नाही, मग अशा लोकांना आपल्याला नेमका त्रास काय होतोय हे सांगता कसं येईल? मग ते बिचारे असंच काहीतरी करणार ना? म्हणतात ना, नवरा मेला तरी चालेल, पण सवत विधवा झाली पाहिजे… म्हणजे काय कोणाचाही फायदा झाला तरी चालेल, पण माझी जळतेय ती आग शांत झाली पाहिजे. मग ज्याच्यासाठी करतोय त्याच, त्याच्या इमेजचं नुकसान झालं तरी चालेल. एवढं करूनही जळजळ शांत होते की नाही, हे फक्त ज्याचं जळतं त्यालाच कळतं.

Previous Post

एका उड्डाणाची दुसरी गोष्ट…

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.