• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे

Marmik Team by Marmik Team
November 27, 2026
in बाळासाहेबांचे फटकारे
0
बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांनी मार्मिक सुरू केल्यानंतर अवघ्या सहा वर्षांतच शिवसेनेची स्थापना झाली आणि ते समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात आले, एक राजकीय नेते बनले, नंतर राष्ट्रीय पातळीवर पोहोचले. त्यामुळे त्यांच्या राजकीय व्यंगचित्रांचाच अधिक बोलबाला झाला. पत्रकार बाळासाहेब आणि निखळ व्यंगचित्रकार बाळासाहेब हे त्यांचे पैलू तुलनेने दुर्लक्षित राहिले. पण, ते संपादक होते, लेखक होते, वाचक होते- साहित्याची त्यांची समज दांडगी होती. त्यामुळे क्वचित प्रसंगी त्यांचा कुंचला समाजात बोकाळलेल्या दांभिकपणावर चालला की त्यातून बहारदार रविवारची जत्रा उभी राहात असे. सतराशे साठ साहित्य संमेलनांच्या सुकाळाच्या काळात प्रस्थापित साहित्यिकांवर दुगाण्या झाडून लोकप्रियता मिळवणाऱ्यांची कमतरता नव्हती. ही परंपरा जुनीच म्हणायची! आपण कोण, कोणाबद्दल बोलत आहोत, याचा विचारही न करता स्वत:ला बंडखोर म्हणवणारे नग मोठमोठ्या साहित्यिकांबद्दल काय मौक्तिकं उधळायचे, त्याचं दर्शन बाळासाहेबांनी या सणसणीत जत्रेमध्ये घडवलं आहे. यातले काही चेहरेही ओळखीचे वाटतात, काहींची ओळख त्यांच्या शब्दसंपदेतून पटते. प्रत्येक माणूस समोर उभा राहून वैचारिक पिंक टाकतो आहे, असं वाटणारं जिवंत चित्रण बाळासाहेबांनी केलं आहे. साहित्याच्याच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या उंचीचा (किंवा खरंतर तिच्या अभावाचा) विचारही न करता टीका-टिप्पणी करण्याचा हा रोग आता सोशल मीडियामुळे कोविडसारखा साथीचा आणि असाध्य रोग बनून बसला आहे.

Previous Post

शेअर आणि म्युच्युअल फंड

Next Post

मोदीआजोबांचा सल्ला!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.