साधारणपणे 1795 ते 1818 या कालखंडात गाजलेल्या भीमा कोरेगाव संघर्षावर लवकरच ‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. गीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक रमेश थेटे हा सिनेमा आणत आहेत. या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच मुंबईत जाहीर करण्यात आला. यात अप्जुन रामपाल, सनी लियोनी, दिगंगना सूर्यवंशी, अभिमन्यू सिंह, कृष्णा अभिषेक, गोविंद नामदेव, अशोक समर्थ, ऋषी शर्मा वगैरेंच्या यात प्रमुख भूमिका आहेत. गजेंद्र अहिरे या सिनेमाचे क्रिएटीव्ह डायरेक्टर आहेत. नितीन देसाईंचे कला दिग्दर्शन असून डान्स डायरेक्शन गणेश आचार्य करणार आहेत. या सिनेमाविषयी अधिक माहिती देताना रमेश थेटे म्हणाले की, हा सिनेमा बहुतांश भीमा-कोरेगाव संघर्षावर बेतलेला असला तरी त्यात मनोरंजनाच्या दृष्टीने काही ठिकाणी आम्ही दिग्दर्शकीय स्वातंत्र्य घेतले आहे.
भीमा-कोरेगाव हा चित्रपट नागवंशी-माहर समाजातील 500 सैनिकांनी दुसरा बाजीराव पेशवा यांच्या 28 हजार सैन्याविरूद्ध केलेला उठाव दाखवणार आहे. या संघर्षानंतर पेशवाई संपुष्टात आली होती. या सिनेमाच्या फर्स्ट लुक सोहळ्यात अभिनेत्री सनी लियोनी हिने ‘रंगिली रात का रंग था वो न्यारा’ या गाण्यावर लावणी नृत्य सादर केले. श्रेया घोषाल हिने हे गाणे गायले आहे.