न्यूयॉर्क टाइम मॅगझीननं अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना वर्ष 2020 साठी पर्सन ऑफ द इयर घोषित केले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत बहुप्रतिक्षित अशा राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुका पार पडल्या. निवडणुकांच्या निकालानंतर जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा विजय झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा मोठया फरकानं पराभव केला. तर दुसरीकडे कमला हॅरिस यांच्या हातीदेखील उप-राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्याचा निर्णय अमेरिकन जनतेने घेतला आहे. गेल्या वर्षी पर्यावरणाच्या चळवळीत सहभागी असलेल्या ग्रेटा थनबर्गला पर्सन ऑफ द इयर ने सन्मानित करण्यात आले होते. तर 2016 मध्ये अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा सन्मान मिळाला होता.
सौजन्य- सामना