• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

#HappyBirthday बस कंडक्टर ते ‘सुपरस्टार’, वाचा रजनीकांत यांचा रोमहर्षक प्रवास

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 12, 2020
in घडामोडी
0
#HappyBirthday बस कंडक्टर ते ‘सुपरस्टार’, वाचा रजनीकांत यांचा रोमहर्षक प्रवास

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि चाहत्यांनी देवाचा दर्जा दिलेले अभिनेते, सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. 12 डिसेंबर, 1950 ला जन्मलेल्या रजनीकांत यांनी वयाची 70 वर्ष पूर्ण केली आहेत. वाढदिवसानिमित्त रजनीकांत यांच्यावर जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रजनीकांत यांचा आतापर्यंतचा रंजक प्रवास पाहूया..

1. 12 डिसेंबर, 1950 रोजी रजनीकांत यांचा बंगळुरूमध्ये जन्म झाला. रजनीकांत यांचा जन्म हेंद्रे पाटील या मराठी कुटुंबात झाला आणि त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रामोजीराव आणि आईचे नाव जिजाबाई गायकवाड आहे.

rajinikanth-8

2. रजनीकांत यांनी सुरुवातीच्या काळामध्ये बस कंडक्टर म्हणूनही काम केले. यासोबत ते नाटकामध्येही काम करायचे.

rajinikanth-5

3. रजनीकांत यांचा नाटकातील अभिनय पाहून तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक बालाचंद्र प्रभावित झाले आणि 1975 ला आलेल्या ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटामध्ये त्यांना भूमिका दिली. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला.

rajinikanth-7

4. दिसायला यथातथाच असलेल्या रजनीकांत यांची संवाद शैली प्रचंड गाजली आणि तमिळ चित्रपट भैरवीमध्ये मिळालेल्या भूमिकेचे त्यांनी सोने केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

rajinikanth-6

5. जवळपास 10 वर्ष तमिळ इंडस्ट्री गाजवल्यानंतर 1983 मध्ये रजनीकांत यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ‘अंधा कानून’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. हा चित्रपटदेखील सुपरहिट ठरला.

rajinikanth-4

6. 26 फेब्रुवारी 1981 रोजी रजनीकांत यांनी लता रंगाचारी यांच्याशी विवाह केला. रजनीकांत यांना सौंदर्या आणि ऐश्वर्या या दोन मुली आहेत.

rajinikanth

7. नव्वदच्या दशकामध्ये रजनीकांत यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट दिले. यामुळे त्यांना सुपरस्टार हे बिरूद चिकटले.

rajinikanth-3

8. दाक्षिणात्य चित्रपटांसह रजनीकांत यांनी बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपट केले. 2007 साली आलेला त्यांचा ‘शिवाजी द बॉस चित्रपट’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. 2010 साली प्रदर्शित झालेल्या ‘रोबोट’ने इतिहास रचला. तर 2018 साली प्रदर्शित झालेला ‘2.0’ चित्रपट सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट ठरला होता.

rajinikanth-2

9. रजनीकांत यांना 2000 साली केंद्र सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत केले. 2015 मध्ये त्यांना पद्म विभूषण हा पुरस्कार देण्यात आला.

rajnikanth9

रजनीकांत आता राजकारणात प्रवेश करणार असून 31 डिसेंबर, 2020 ला आपल्या पक्षाची घोषणा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.

 

सौजन्य- सामना

Previous Post

पुणे – विमानतळ परिसरात बीम लाईटला मनाई

Next Post

जो बायडेन, कमला हॅरिस ‘टाइम पर्सन ऑफ इयर’

Next Post
जो बायडेन, कमला हॅरिस ‘टाइम पर्सन ऑफ इयर’

जो बायडेन, कमला हॅरिस ‘टाइम पर्सन ऑफ इयर’

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.