• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य (१९ ते २५ सप्टेंबर २०२६)

भास्कर आचार्य

Marmik Team by Marmik Team
September 19, 2026
in भविष्यवाणी
0
राशीभविष्य ( २१ ते २७ फेब्रुवारी २०२६)

ग्रहस्थिती : हर्षल वृषभेत, मंगळ मिथुनेत, गुरू कर्केत, शुक्र तुळेत, प्लूटो मकरेत, राहू कुंभेत, शनि नेपच्युन मीनेत, रवि केतु सिंहेत, बुध कन्येत. दिनविशेष : दिनविशेष १९ सप्टें. ज्येष्ठा गौरी विसर्जन, २० सप्टें. अदुःख नवमी, २२ सप्टें. परिवर्तिनी एकादशी, २४ सप्टें. प्रदोष, २५ सप्टें. अनंत चतुर्दशी.

 

मेष : तरुणांचा भाग्योदय करणारा काळ. नवीन कामाच्या संधी येतील. करियरला आकार मिळेल. विदेशातील कामे मार्गी लागतील. व्यवसायात कायदेशीर कटकटी होतील. स्पर्धेचा सामना करावा लागेल. ज्येष्ठांच्या, मुलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. प्रवासात काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांशी जमवून घ्या. सल्ला देण्याची सवय बाजूला ठेवा. आठवड्याअखेर मन:स्तापदायक प्रसंग घडतील. आर्थिक बाजू भक्कम राहील.

वृषभ : नोकरीत कामाची तारीफ होईल. प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत. व्यवसायात प्रगती होईल. मोठ्या कामाची संधी मिळेल. सरकारी कामे पुढे जातील. तरुणांना मनासारखी कामे मिळतील. स्पर्धेत यश मिळेल. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. मित्रांशी वाद होतील. आत्मविश्वास प्रबळ होईल. मालमत्तेसंदर्भात तोडगा निघेल. मनस्ताप वाढवणार्‍या गोष्टीपासून दूर राहा. सामाजिक कार्यातून आनंद मिळेल. लेखक, पत्रकार, संपादकांचा सन्मान होईल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. मुलांना शिक्षणात यश मिळेल.

मिथुन : तरुणांना यशदायी काळ. प्रेमप्रकरणात वादाची ठिणगी पडेल. भागीदारीत, व्यवसायात यश मिळेल. कुटुंबीयांसोबत सहलीला जाल. आठवड्याअखेर घरातील वातावरण आनंदी ठेवा. कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. वेळेचे गणित आणि कामाचे तंत्र बिघडू देऊ नका. आर्थिक बाजू चांगली राहील, पण, खर्चावर नियंत्रण ठेवा. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. नोकरीत कामानिमित्त प्रवास कराल. लेखक, प्रकाशनात मान-सन्मान मिळेल. नव्या संकल्पना व्यवसायात रूपांतरित होतील. वादाचे प्रसंग टाळा. मित्रांशी वागताना बोलताना काळजी घ्या.

कर्क : शुभवार्ता कानी पडतील. कामातला उत्साह वाढेल. नोकरीत उत्तम परिस्थिती राहील. कायदेशीर प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात नव्या कामाच्या संधी मिळतील. लॉटरी, सट्टा, शेअरमध्ये नुकसान होईल. व्यवसायात नवे पर्याय उपलब्ध होतील. जुनी सरकारी कामे मार्गी लागतील. संयम ठेवा, काम अलगद पूर्ण होईल. कामानिमित्ताने प्रवास, दगदग वाढेल. राग अन्य कोणावर काढू नका. मनाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ध्यान, योगाचा फायदा होईल. महिलांना यश देणारा काळ. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. त्यामुळे सकारात्मकता आणि उत्साह वाढेल.

सिंह : मोठे आर्थिक व्यवहार टाळा. बँकांची कामे रेंगाळतील. तरुणांना, कलाकारांना मनासारखी कामाची संधी मिळेल. अनोळखी व्यक्तीशी जपून व्यवहार करा. महिलांना यश मिळेल. निर्णय घेताना घाई टाळा. वित्त सल्लागार, मेडिकल क्षेत्रात चांगला काळ. पत्नीशी वाद टाळा. व्यवसायात गोंधळ उडेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. शिक्षणात मुलांना यश मिळेल. तरुणांनी हातात घेतलेले काम सहज पूर्ण होईल. अतिविश्वास दाखवणे टाळा. नोकरीत प्रगती होईल. कर्जाचे प्रश्न मार्गी लागतील. कुटुंबात वाद घडतील. कोणाला आश्वासन देऊन फसू नका.

कन्या : मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात तेजी राहील. घरासाठी खरेदी होईल. पोटाचे विकार त्रास वाढवतील. नोकरीत प्रमोशन, पगारवाढीची बातमी कळेल. प्रवासात काळजी घ्या. वस्तू गहाळ होतील. लॉटरीमधून नशीब उजळेल. आठवड्याअखेरीस आनंद वाढेल. येणे वसूल होईल. कुटुंबीयांसोबत प्रवास होईल. तरुणांचे उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. कामाचा हुरूप वाढेल. घसादुखी, ताप, त्रासदायक ठरू शकतात. कलाकार, चित्रकार, लेखक, संगीतकारांचा मान-सन्मान होईल. सार्वजनिक जीवनात एखाद्या घटनेमुळे रंगाचा बेरंग होईल.

तूळ : नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. तरुणांना स्पर्धापरीक्षेत यश मिळेल. व्यवसायात कामाच्या संधी वाढतील. आठवड्याअखेर वेळ आणि कामाचे गणित बिघडेल. संसर्गजन्य आजार डोकेदुखी वाढवेल. प्रवासात विशेष काळजी घ्या. व्यवसायात आर्थिक गणित चुकेल. देवधर्मातून समाधान मिळेल. सरकारी, बँकेची कामे पूर्ण होतील. कर्तृत्व उजळेल. महिलांना चढ-उतारांचा सामना करावा लागेल.

वृश्चिक : नातेवाईकांच्या मदतीने मोठे काम पूर्ण होईल. कुटुंबासोबत प्रवासाला जाल. नोकरीत जमवून घ्या. व्यवसायात कामाचा कंटाळा येईल. आर्थिक बाजू चांगली ठेवण्यासाठी अधिकचे प्रयत्न करा. मित्रांबरोबर मौजमजेवर वेळ आणि पैसे खर्च होतील. जमीन-जुमल्याची कामे लांबणीवर पडतील. शेअर ब्रोकर, इस्टेट एजन्ट, शेतीविषयक उपकरणाचा व्यापार करणार्‍यांना लाभाचा काळ. मुलांकडून आनंद वाढेल. नोकरीत कामाचा कंटाळा येईल. अचानक प्रवास करावा लागेल. गुरुकृपा राहणार आहे.

धनु : बुद्धिजीवी मंडळींना यशदायी काळ. तरुणांना चांगल्या नोकरीच्या संधी चालून येतील. कोणत्याही गोष्टी हट्टाने पुढे नेऊ नका, त्रास होऊ शकतो. जुने व्यावसायिक येणे वसूल होईल. मित्रांच्या मदतीने अवघड तिढा सुटेल. घरात आनंदवर्धक घटना घडेल. छोटेखानी समारंभ होईल. गुंतवणुकीच्या प्रलोभनात फसू नका. सार्वजनिक जीवनात डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर हे तत्व सोडू नका. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ राहील. नव्या संकल्पना यशस्वी होतील. शिक्षक, संशोधकांसाठी चांगला काळ. मामा, मावशींची मदत मिळेल. वादात अडकून पडू नका.

मकर : व्यवसायात यशदायी काळ. तरुणांच्या कामाचे कौतुक होईल. नव्या कामाच्या संधी चालून येतील. कामासाठी विदेशात जाल. नव्या वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल. नोकरीत प्रगती कराल. पोटातल्या गोष्टी ओठावर आणू नका. भावनेत गुंतून निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. आठवड्याअखेर नोकरी-व्यवसायात सामोपचाराची भूमिका ठेवा. व्यवसायात भरपूर काम करावे लागेल. वेळ व कामाचे गणित सांभाळा. बँकांची कामे करताना कागदपत्रे तपासा. ज्येष्ठांचा सल्ला माना. खेळाडूंना यश मिळेल. प्रलंबित काम मध्यस्थाच्या माध्यमातून मार्गी लागेल.

कुंभ : सरकारी नियमाचे उल्लंघन करू नका. व्यवहार करताना भान ठेवा. ब्रोकर, रियल इस्टेट व्यावसायिकांना चांगला काळ. कवी, संगीतकार, चित्रकारांचा मानसन्मान वाढवणार्‍या घटना घडतील. नियोजन करून पुढे चला, वेळ आणि पैसे या दोन्हीची बचत होईल. व्यवसायात थकीत येणे वसूल होईल. जुन्या ओळखींमधून अडकलेली कामे पुढे सरकतील. मित्रांशी चेष्टामस्करी टाळा. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. नोकरीच्या ठिकाणी कामाचे ओझे घेऊ नका. व्यवसायात सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून निर्णय घ्या. कामावर लक्ष द्या, चुका टाळा.

मीन : गणेशाची कृपा राहील. महत्वाची कामे पूर्ण होतील. तरुणांना करियरला आकार देणारे मार्ग सापडतील. सरकारी कामे पुढे नेताना अधिक कष्ट घ्यावे लागतील. मोठे निर्णय घेताना घाई नको. व्यवसायात मोठे यश मिळेल. संततीकडून चांगली बातमी कळेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत नवीन जबाबदारीत प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. लॉटरी, सट्टा यातून नुकसान होईल. घरात आणि बाहेर किरकोळ वाद टाळा. मित्रांशी जेव्हढ्यास तेवढे राहा. चेष्टा-मस्करी नकोच. भागीदारीत आपलेच म्हणणे रेटू नका.

Previous Post

गेले ते दिन गेले!

Next Post

उंडेर्‍याची खीर

Next Post
उंडेर्‍याची खीर

उंडेर्‍याची खीर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.