• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय नो नेव्हर

संतोष पवार

Marmik Team by Marmik Team
September 12, 2026
in भाष्य
0
नाय नो नेव्हर

संतोषराव, तुम्ही कोणत्या बाजूचे? डीजे लावण्याच्या बाजूचे की डीजेमुक्तीच्या बाजूचे?-रवींद्र पायगुडे, पुणे
आम्ही कोणाचीही बाजू न घेता… त्यांची मजा पहात… ‘तुम्ही कोणाच्या बाजूचे?’ असा प्रश्न इतरांना विचारणार्‍यांच्या बाजूचे…. तुमचं आणि आमचं सेम आहे पायगुडे भाऊ!

विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीनंतर त्या बातमीला‘बापट यांना चापट’असे सवंग मथळे देणार्‍या प्रसारमाध्यमांचा यथोचित सत्कार करण्यासाठी शनिवारवाड्यापुढची जागा पुरेल की शिवाजी पार्कच बुक केलेले बरे!- नयना जोशी, शनिवार पेठ, पुणे
नयना ताई, अशा माध्यमांची आणि त्यामध्ये काम करणार्‍यांची संख्या एवढी मोठी आहे की तुम्हाला अ‍ॅक्च्युली त्यांच्या बाबतीत जे काही करावसं वाटतंय ते जंतर-मंतर आणि त्याच्या आधी आणि नंतर… भर आंदोलनात होत असताना बघितलं नाहीये का तुम्ही?… मोठ्यात मोठी जागा हवी हो त्यासाठी.

दहीहंडीमध्ये स्टेज बांधून त्यावर अश्लील अंगविक्षेप करणार्‍या महिलांच्या उत्तान नृत्याची परंपरा कोणत्या काळापासून सुरू झाली असेल आपल्या देशात? वेदकाळापासून की त्रेतायुगापासून? – शंकर शेंडगे, रहिमतपूर
असा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारताय? संतोष या नावामुळे गोंधळला आहात का? नाव संतोष असलं तरी आम्ही संतोष पवार आहोत… संतोष पंडित किंवा संतोष चव्हाण नाही आहोत ओ… तुम्ही म्हणताय त्या काळात, त्या युगात देवाबद्दल ही तक्रार करायची सोय होती… आता देवाच्या भक्तांविरोधातही तक्रार करायची सोय नाही अशा युगात राहतो आहोत आपण!

कोणत्याही उत्सवात लोकांचे कान फोडल्याशिवाय, डोळे आंधळे केल्याशिवाय उत्सव साजरे करणार्‍यांना उत्सव साजरा केल्याचा आनंदच मिळत नाही, हा नेमका काय केमिकल लोच्या आहे? – बाळासाहेब कदम, जुन्नर
प्लॅस्टिक सर्जरी म्हणा किंवा विमान म्हणा, या अशा गोष्टी आपल्या पुराणकाळापासून होत्या हे पटवून देण्यासाठी, तशी उदाहरणं जशी पुराणामध्ये आहेत, त्याप्रमाणे लोकांचे कान फोडून आणि डोळे आंधळे करून सण साजरे केल्याचं उदाहरण अजून तरी आम्हाला पुराणात सापडत नाहीये. फक्त हाच (आणि आमचाच) लोचा आहे… तसं उदाहरण सापडलं की असे सण साजरा करणार्‍यांच्या विरोधात प्रश्न विचारणार्‍या तुमच्यासारख्यांचा लोचा होईल… तोवर धीर धरा… उगाचच केमिकल लोच्या वगैरे म्हणून धर्मविरोधी प्रश्न विचारून, कान फोडणार्‍यांचा आणि डोळे आंधळे करणार्‍यांचा लोचा करू नका…

पुण्यात कोणतीही समाजहिताची सूचना, मागणी किंवा कृती करण्यासाठी पुण्यात रहिवास असल्याचा नेमका किती वर्षांचा, किती पिढ्यांचा निवासी दाखला असायला हवा आणि तो कोणत्या हद्दीपर्यंत ग्राह्य धरावा, तुमची काय सूचना?- लक्ष्मण पाटील, पिरंगुट
२०१४चा दाखला बनवा… आणि कुठलीही मागणी, सूचना किंवा कृती करताना ‘नमो नमो’ असा मंत्र जपा आणि बघा… तुमची कुठलीही मागणी, कृती आणि सूचना ही समाजहिताचीच ठरेल… तिला कुठलीच हद्द नसेल… तुमच्या कुठल्याही कृतीने कुठलीही हद्द पार केली तरी ती कृती समाजहिताचीच असेल.

धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी एक म्हण आहे म्हणे!… पण मग जे धरल्यावर असं काही होणार आहे, ते माणसाने धरावंच कशाला म्हणतो मी!- अशोक क्षीरसागर, तळेगाव
त्यापेक्षा धरल्यावर सोडायचंच नाही असा विचार करा ना… एखादा मुद्दा… तुम्ही कशाबद्दल बोलताय ते कळत नाहीये… पण आम्ही मुद्दा धरून ठेवण्याबद्दल बोलतोय… असं आमच्यासारखं क्लियर बोलत जा… उगाच एखाद्या भगिनीच्या भावना दुखवायच्या आणि मग तिचे पोलीसवाले बंधू तुम्हाला धरायला रात्री अपरात्री तळेगावला पोहोचायचे… उत्तराने संतोष झाला का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परप्रांतीय रिक्षाटॅक्सी चालकांना मराठी शिकायला एक वर्षाची मुदतवाढ देऊन टाकली. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की उत्तर प्रदेशाचे?-शशिकांत शिंदे, कराड
तुम्हाला ज्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना मानायचं असेल ते माना… अजून असं मानण्या-न मानण्यावर सक्ती किंवा बंदी आलेली नाहीये… याबद्दल तरी त्यांचे आभार माना… प्रत्येक गोष्टीला विरोध करू नये…

 

विचारून टाका प्रश्न

तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

Previous Post

राशीभविष्य (१२ ते १८ सप्टेंबर २०२६)

Next Post

मी गणपतीबाप्पा बोलतोय!

Next Post
मी गणपतीबाप्पा बोलतोय!

मी गणपतीबाप्पा बोलतोय!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.