• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय नो नेव्हर

संतोष पवार

Marmik Team by Marmik Team
September 5, 2026
in भाष्य
0
नाय नो नेव्हर
संतोषराव, आज शिक्षक दिन आहे आणि गुरुकुल परंपरेचा अभिमान वगैरे बाळगणार्‍या देशात आज समाजात शिक्षक दीन बनून बसला आहे. असं विसंगत चित्र का दिसत असेल? -मंदाकिनी साबळे, औसा
ताई, तुम्ही फार घाई घाई विचार करताय… त्यामुळे प्रायव्हेट क्लासेसचे शिक्षक विसरताय तुम्ही… त्यांना कसे दिवस कसे आलेयत, ते पण बघा की… पेपरफुटीत नाव फुटून पण त्यांचं नाव कोणी घेतय का? ढगफुटी झाल्यासारखा त्यांच्याकडे पैसा कसा आलाय, त्याबद्दल कोणी बोलतंय का? बाकी तुम्ही गावखेड्यातील शाळेतील शिक्षकांबद्दल बोलत असाल… तर थोडे दिवस थांबा. उरल्या सुरल्या शाळा बंद झाल्या की उरले सुरले शिक्षक पण नाहीसे होतील. मग ना रहेंगे शिक्षक, न रहेगा शिक्षक दिन और ना रहेंगे दीन शिक्षक!
डीजेच्या आवाजाने सगळा समाज बहिरा झाला तरी चालेल, पण आम्ही उत्सवात डीजे वाजवणारच, प्रचंड मोठा आवाज करणारच, असा पवित्रा कोणत्याही उत्सवाचे कार्यकर्ते कसे घेऊ शकतात? जनतेच्या जिवावर निवडून येणारे लोकप्रतिनिधी जनहिताचा विचार न करता, या कार्यकर्त्यांची पाठराखण कशी करू शकतात? -चित्रा भोंडकर, शनिवार पेठ, पुणे
लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांची पाठराखण केली नाही, तर कार्यकर्ते लोकप्रतिनिधींची पाठराखण करतील? आणि ज्याच्या मागे कार्यकर्ते नाहीत त्याला लोक आपला प्रतिनिधी मानतील?.. हे सगळं तंगड्यात तंगडी असलेलं त्रांगडं आहे…
सण-उत्सव हे कसला ना कसला आनंद व्यक्त करण्यासाठी साजरे व्हायला हवेत ना? आता हे धार्मिक आणि सांस्कृतिक शक्तिप्रदर्शनच बनून बसलेलं आहे. त्यात सर्वसामान्य माणसाची गैरसोय करण्याची चढाओढ सुरू आहे. यातून काय आनंद मिळतो सणाचा? -श्रीकांत बावधनकर, पौड रोड, पुणे
 पहिली गोष्ट… ज्यांची गैरसोय होते असं म्हणताय ते फक्त आपल्या सोयीने फक्त भक्तिभावाने सण साजरे करत बसले… आणि डीजे किंवा ढोल ताशे नाही वाजले तर सण साजरा होतोय असा फील कसा येणार? तो फील येण्यासाठीच काहीजण बिचारे डीजे लावून ढोलताशे वाजवतात… आणि दुसरी गोष्ट… लोकांची गैरसोय झालेली बघण्यात पण एक वेगळा आनंद असतो की… त्याला काही नतद्रष्ट विकृत आनंद म्हणतात… त्यांना तो आनंद मिळत असेल… बघा… दोन्ही गोष्टी सेम वाटतील पण जी गोष्ट पटते ती घ्या… दुसरी सोडून द्या!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परप्रांतीय रिक्षाटॅक्सी चालकांना मराठी शिकायला एक वर्षाची मुदतवाढ देऊन टाकली. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की उत्तर प्रदेशाचे?-शशिकांत शिंदे, कराड
माणसांच्या शाळा बंद करणारे निसर्गाकडून कसं काय काही शिकू शकतात? किंवा माणसांना शिकवण्यासाठीच देवाने ज्यांना पाठवलय, त्यांनाच देव मानणार्‍यांना निसर्ग बिचारा काय शिकवणार? असं तुम्ही स्वतःलाच शिकवा… म्हणजे तुम्हाला पडलेला प्रश्न परत पडणार नाही… (पण तुमच्या प्रश्नावरून आम्हाला प्रश्न पडलाय की तुम्ही नक्की नेपाळच्या निसर्गाच्या धड्याबद्दल बोलताय की नेपाळच्या जनतेच्या धड्याबद्दल बोलताय… तुम्ही कितीही उलटा घास घेतला तरी समजणार्‍यांना समजत हो!)
चष्मा काढून ठेवला की नंतर तो सापडायची पंचाईत होते. चष्मा नसल्यामुळे चष्मा समोरच असला तरी दिसत नाही आणि शोधत फिरावे लागते. या समस्येवर तुमच्याकडे काही उपाय आहे का संतोषराव?  -महेश कांबळे, जिंतूर
जय श्रीराम म्हणा आणि दुसर्‍या कामाला लागा… जय श्रीराम म्हटलं की भल्या भल्या समस्या लोक विसरतात… तुमची चष्म्याची समस्या किस झाड की पत्ती.. (जय श्रीराम या घोषणेच्या विरोधात बोला किंवा फेवरमध्ये बोला.. लोक इतर समस्या विसरतात हे लक्षात ठेवा…)
सरसंघचालक मोहन भागवत आपण सकाळी एक बोलतात, दुपारी भलतंच बोलतात, संध्याकाळी तिसरंच बोलतात… आणि एका संपूर्ण समाजाच्या वतीने बोलायचा अधिकार त्यांना कुणी दिला आहे?  -नितीन पाटील, चंद्रपूर
स्वयंसेवक म्हणून त्यांना कोणी घोषित केले आहे का? मग… स्वयंसेवक म्हणून स्वयंघोषित करणार्‍यांना कोणी कशाला अधिकार द्यायला हवा?  त्यांच्या अधिकारांचा विचार न करता तुम्ही तुमच्या अधिकारांचा विचार करा, नितीनराव…
Previous Post

राशीभविष्य (५ ते ११ सप्टेंबर)

Next Post

व्हॉट्सअप जेव्हा हॅक होते…

Next Post
व्हॉट्सअप जेव्हा हॅक होते…

व्हॉट्सअप जेव्हा हॅक होते...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.