
देवेंद्र फडणवीस
तुम्ही कितीही पतंग उडवा
माझा मांजा तारेचा
शिंदेसुद्धा थकून गेले
दोर पाहून मांज्याचा

राज्याची पुरी वाट लावून
येईन मी तर पुन्हा पुन्हा
माझ्याशिवाय नाहीच दुसरा
अनुभवी अन् नेता जुना
मोदी-शहांना माहीत आहे
कॅपॅसिटी तर माझीच भारी
कोणी वंदा, कोणी निंदा
जोरात आहे आमची स्वारी
देवेंद्र फडणवीस
तुम्ही कितीही पतंग उडवा
माझा मांजा तारेचा
शिंदेसुद्धा थकून गेले
दोर पाहून मांज्याचा

राज्याची पुरी वाट लावून
येईन मी तर पुन्हा पुन्हा
माझ्याशिवाय नाहीच दुसरा
अनुभवी अन् नेता जुना
मोदी-शहांना माहीत आहे
कॅपॅसिटी तर माझीच भारी
कोणी वंदा, कोणी निंदा
जोरात आहे आमची स्वारी
एकनाथ शिंदे
सगळेच हातून निसटून चाललेय
पोटात माझ्या आलाय गोळा
न्यायमूर्ती तर सुप्रीम भासतात
करून टाकतील चोळामोळा

फडणवीस तर वाटच बघतायत
कधी माझा निघेल काटा
तोंडावरती गोड गोड बोलतात
आवळत आणल्यात माझ्या वाटा
सीएमपदाचे स्वप्न दाखवून
मोदी-शहा हे मलाच झुलवतात
एक दिवस ते देतील हाकलून
खोटी आशा मनी फुलवतात
नरेंद्र मोदी
जेन झीसारखे वागूनसुद्धा
तरुण होता येत नाही
त्यांचे डोके कितीतरी फास्ट
तसाच होण्याची करतो घाई

एकदा वाटते त्यांच्यासारखेच
अगदी बिनधास्त जीवन जगावे
पंचविशीचा होऊन पुन्हा
पूर्वीसारखेच छपरी व्हावे
नकोच संसाराचा ताप
नकोच राजकारणाचा व्याप
रात्री रील्स करून करूनही
ठरेन का मी त्यांचा बाप
अमित शहा
इलेक्शन आयोग, न्यायाधीशही
सगळेच आमच्या आहेत मर्जीत
कसा देतील निकाल विरोधात
म्हणूनच आम्ही आहोत गुर्मीत

संसदेतही हैराण करतील
म्हणन बाहेर लपून बसतो
मोका पाहून आवाज चढवतो
उसने अवसान आणून फसतो
आता पुढचे कठीण आहे
या पोरांनी आणलेय टेन्शन
मोदीसुद्धा विचित्र वागतात
मी तर म्हणतो, प्लीज अटेन्शन
